IN PICS : अक्षय, आलिया, कतरिना, सलमान.... ३० सेकंदाच्या जाहिरातीतून कोट्यवधी कमावतात 'हे' स्टार्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 5:52 PM1 / 11 बॉलिवूडचा सगळ्यात बिझी कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठीही करोडोचं मानधन घेतो. अक्षय कुमार एका जाहिरातीसाठी तब्बल ८ ते १० कोटी रुपये मानधन आकारतो.2 / 11बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत झळकतो. एका जाहिरातीसाठी तो ५ ते १० कोटी रुपये मानधन घेतो.3 / 11बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणही मागे नाही. अजय एका जाहिरातीसाठी १ ते ५ कोटी रुपये घेतो.4 / 11कतरिना कैफ लवकरच टायगर ३ या सिनेमात झळकणार आहे. कॅट एका जाहिरातीसाठी १ ते ३ कोटी रुपये मानधन घेते.5 / 11बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान मोजक्या जाहिराती करतो अन् एका जाहिरातीसाठी ४ ते १० कोटी रुपये मानधन घेतो.6 / 11बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचं मानधनही तगडं आहे. एका जाहिरातीसाठी ती ७ ते १० कोटी रुपये घेते.7 / 11नुकतीच आई झालेली आलिया भट एका जाहिरातीसाठी किती मानधन घेते, तर १ ते ३ कोटी रुपये.8 / 11अभिनेत्री अनुष्का शर्मा दीर्घकाळापासून कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. पण म्हणून तिची क्रेझ संपलेली नाही. एका जाहिरातीसाठी ती ७ ते ८ कोटी रुपये मानधन घेते.9 / 11कतरिना कैफचा नवरोबा अर्थात अभिनेता विकी कौशल एका जाहिरातीसाठी १ ते ५कोटी रुपये घेतो.10 / 11आयुष्मान खुरानाने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिलेत. एका जाहिरातीसाठी तो १ ते ५ कोटी रुपये घेतो.11 / 11सनी लिओनीला सिनेमे मिळत नाहीत. पण जाहिरातीतून ती बक्कळ कमाई करते. एका जाहिरातीसाठी सनी ५० ते ६० लाख रुपये मानधन घेते. आणखी वाचा Subscribe to Notifications