Join us

फोटोमागची कहाणी काहीही असो, पण हे आहेत बॉलिवूड स्टार्सचे काही Controversial Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 2:13 PM

1 / 12
2006 मध्ये मीकाने त्याच्याच बर्थ डे पार्टीत राखी सांवतला सर्वांसमोर किस केले होते. या घटनेमुळे राखी चांगलीच भडकली होती. मीकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती. 14 वर्षांपूर्वी मीका सिंहचा हा किसचा कारनामा आजही लोक विसरलेले नाहीत.
2 / 12
महेश भट्ट यांनी मुलीलाच चुंबन करताने फोटो आजही सा-यांच्या लक्षात आहे. या फोटोवर स्पष्टीकरण देण्यासाठी भट्ट यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांना अनेक उलट सुलट प्रश्न विचारण्यात आले होते. उत्तर देताना भट्ट यांची जीभ घसरली आणि नको ते बोलुन बसले होते. पुजा भट्ट मुलगी नसती, तर मी तिच्याबरोबर लग्नही केले असते, असे विधान त्यांनी केले होते.
3 / 12
2007मध्ये मुंबईत आयोजित एड्स अवेअरनेस प्रोग्रामवेळी हॉलिवूड अभिनेते रिचर्ड गेर यांनी शिल्पा शेट्टीला सार्वजनिक ठिकाणी किस केले होते. त्यावेळी शिल्पाला टीकेला सामोरे जावे लागले होते.
4 / 12
मंदिराच्या एका पुजा-याने शिल्पा शेट्टीच्या गालाचे चुंबन घेतले होते. या फोटोवरून बराच वाद झाला होता.
5 / 12
शाहरूख खान व John Barrowman यांच्या या फोटोने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.
6 / 12
2015 साली अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्या फोटोंनी खळबळ माजवली होती. राम जेठमलानींनी एका कार्यक्रमात लीना यांना किस केले होते. या फोटोची जबरदस्त चर्चा झाली होती.
7 / 12
अक्षय कुमार व टिष्ट्वंकल खन्नाने एका इव्हेंटमध्ये जे काही केले त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता.
8 / 12
बिपाशा बासू व अमिषा पटेल यांचे हे फोटोशूट चांगलेच वादात सापडले होते.
9 / 12
शक्ती कपूरच्या या फोटोशूटने एकेकाळी मीडियाचे लक्ष वेधले होते.
10 / 12
जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफ यांच्या या न्यूड फोटोशूटने सगळ्यांच्या भूवया उंचावल्या होत्या.
11 / 12
दीपिका पादुकोण व सिद्धार्थ माल्या एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. 2003 मध्ये आयपीएल मॅचदरम्यान सिद्धार्थने सर्वांसमोर दीपिकाला किस केले होते. या फोटोमुळे खळबळ उडाली होती.
12 / 12
अभिनेत्री ममता कुलकर्णीने स्टारडस्ट मॅगझिनसाठी एक कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूटवरून तेव्हा मोठा वाद झाला होता.
टॅग्स :बॉलिवूड