Join us  

लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 5:02 PM

1 / 11
तृप्ती डिमरीने 'कला', 'बुलबुल', 'लैला मजनू' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं होतं. या चित्रपटांमध्ये तिची चमकदार कामगिरी असूनही अभिनेत्रीला स्टारडम आणि लोकप्रियता मिळाली नाही.
2 / 11
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' चित्रपटातील एका छोट्या भूमिकेने अभिनेत्रीचं नशीबच बदलून टाकलं. रातोरात तृप्ती स्टार झाली.
3 / 11
छोट्याशा भूमिकेने अभिनेत्रीला नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली, जी 'लैला मजनू', 'बुलबुल' आणि 'कला' मध्ये लीड रोल करूनही मिळू शकली नाही.
4 / 11
एकीकडे तृप्ती तिला मिळत असलेली लोकप्रियता एन्ज़ॉय करत आहे, तर दुसरीकडे आता आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं तिला वाटत आहे.
5 / 11
द हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, स्टारडमचेही अनेक तोटे असतात. 'ॲनिमल रिलीज होण्यापूर्वी मी भाजी घेण्यासाठी बाजारात जात असे.'
6 / 11
'हे खूप मनोरंजक आहे कारण एकीकडे तुम्हाला अभिनेत्री म्हणून अशीच लोकप्रियता हवी असते, तर दुसरीकडे मला माझं स्वातंत्र्य जास्त आवडतं.'
7 / 11
'मला रस्त्यावर एकटं फिरणं, मित्रांसोबत वेळ घालवणं आणि स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं. पूर्वी मी या सर्व गोष्टी कोणत्याही अडचणीशिवाय करू शकत होते.'
8 / 11
'आता मात्र मला अधिक सावध राहावं लागतं. माझं स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे असं वाटतं' असं तृप्ती डिमरीने म्हटलं आहे.
9 / 11
तृप्तीचं मत आहे की, यामुळेच बहुतेक स्टार्स एकांत मिळवण्यासाठी परदेशात जातात. शूटिंगमधून वेळ काढून सुट्टी साजरी करणं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.
10 / 11
तृप्ती डिमरीने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.
11 / 11
टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूड