Tripti Dimri's Black Outfit Glamorous And Bold Latest Photoshoot
PHOTOS : 'लेडी बॉस' तृप्ती डिमरीचा हटके स्वॅग, ग्लॅमरस लूकची एकच चर्चा! By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 04:10 PM2024-12-09T16:10:30+5:302024-12-09T16:19:56+5:30Join usJoin usNext तृप्तीने बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तृप्ती डिमरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. 'अॅनिमल' या चित्रपटामुळे तृप्ती एका रात्रीत स्टार बनली. 'अॅनिमल' नंतर तृप्ती 'बॅड न्यूज', 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' आणि 'भूल भुलैया 3' या सिनेमातही झळकली. चाहत्यांना आता तिच्या नव्या सिनेमाची उत्सुकता आहे. अशातच तृप्तीच्या नव्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होतेय. तृप्तीने बॉस लेडी लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्लासिक बॉसी स्टाइलमध्ये तृप्ती खूप सुंदर दिसतेय. तिचा हा लूक झक्कास आहे. तृप्तीने आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश लूकने सर्वांना वेड लावले आहे. न्यूड, मेकअप, काळ्या रंगाचे स्टायलिश कानातले आणि मोकळे केस हे तिच्या लूकमध्ये अधिकच भर घालत आहेत. बॉसी स्टाइल ब्लॅक कलर कोट आणि हाफ पँटमध्ये तृप्ती खूपच स्टायलिश दिसत आहे. तिने मॅचिंग सँडलसह तिचा लूक पूर्ण केला आहे देसी असो वा वेस्टर्न प्रत्येक वेळी आपल्या किलर लूकने चाहत्यांची मनं जिंकण्यात तिचा हातखंडा आहे. आगामी काळात तृप्ती बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ही नवी जोडी विशाल भारद्वाजचा अॅक्शन चित्रपट ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार आहे.टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूडTripti Dimribollywood