Tujhe Meri Kasam : रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम', ना ओटीटीवर, ना टीव्हीवर; काय आहे यामागे कारण ? By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 9:57 AM1 / 9३ जानेवारी २००३ रोजी 'तुझे मेरी कसम' हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया ही गोड जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. दोघांची एकमेकांशी ओळखही याच सिनेमामुळे झाली.2 / 9तुझे मेरी कसम २० वर्ष पूर्ण झाले. अनेकांनी हा सिनेमा बघितला असेलच पण असेही काही जण आहेत ज्यांनी अद्याप हा सिनेमा बघितलेला नाही. कारण हा चित्रपट ना टीव्हीवर लागतो ना कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर3 / 9सिनेमाची कथा कॉलेज जीवनावर आहे. रितेश जिनिलिया दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात पण त्यांच्यात प्रेमही आहे याची जाणीव त्यांना झालेली नसते. याचभोवती ही कथा फिरते.4 / 9मराठमोळ्या रितेशचा हा मुख्य भूमिकेतील हा पहिलाच बॉलिवुड सिनेमा असेल असं वाटणारही नाही इतक्या आत्मविश्वासाने त्याने काम केले आहे. तर जिनिलिया नेहमीसारखीच क्युट दिसली आहे.5 / 9तुझे मेरी कसम ने महाराष्ट्राला ही गोड जोडी दिली. या चित्रपटामुळे दोघांचे आयुष्यच बदलून गेले. ही जोडी हिट झाली आणि चाहत्यांच्या मनात घर करुन गेली.6 / 9के विजय भास्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर रामोजी राव यांनी सिनेमाची निर्मिती केली. आता गंमत अशी आहे की रामोजी राव यांनी सिनेमाविषयी एक मोठी निर्णय घेतला आणि त्यामुळेचट आज तुझे मेरी कसम कोणत्याच प्लॅटफॉर्मवर पाहता येत नाही7 / 9रामोजी राव यांनी सांगितले हा सिनेमा जर प्रेक्षकांना खूप आवडला तर तो त्यांनी हवा तेव्हा थिएटरमध्ये येऊनच बघायला हवा. असं म्हणत रामोजी यांनी सिनेमाचे सगळे राईट्स स्वत:कडेच ठेवले. 8 / 9या कारणामुळेच ना या चित्रपटाची कधी डीव्हीडी आली आणि ना हा सिनेमा टीव्हीवर लागला. अगदी पायरेटेड कॉपी सुद्धा कोणाला मिळू शकली नाही. ओटीटी वर सिनेमा पाहायचा तर प्रश्न दूरच राहिला.9 / 9नंतर काही वर्षांनी रितेश आणि जिनिलियाने तेरे नाल लव्ह हो गया ही सिनेमा केला. याला सुद्धा प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता दोघेही वेड हा सिनेमा घेऊन आले आहेत जो बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आणखी वाचा Subscribe to Notifications