Join us

अक्षय कुमारची मेहुणी सध्या आहे कुठे? करिअर फ्लॉप होताच इंडस्ट्रीतून झाली गायब, आता जगतंय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 3:08 PM

1 / 9
डिंपल कपाडीया आणि राजेश खन्ना यांची धाकटी लेक रिंकी खन्ना सध्या काय करत याबाबत फारसे कोणाला काही माहिती नाही. गेल्या अनेकवर्षापासून ती झगमगाटाच्या दुनियेपासून लांबच आहे.
2 / 9
रिंकीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हा ती अवघ्या 17 वर्षाची होती. रिंकीची बॉलिवूड कारकीर्द खूपच लहान होती. रिंकीने चार वर्षांच्या कारकीर्दीत सुमारे 9 सिनेमात काम केले आहे.
3 / 9
रिंकीने वर्ष 1999 मध्ये प्यार या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा झी सिने पुरस्कारही मिळाला.
4 / 9
यानंतर ती गोविंदा आणि सोनाली बेंद्रे यांच्या 'जिस देश में गंगा रेहता है' या सिनेमात एक सहाय्यक भूमिकेत दिसली होती. ''मुझे कुछ कहना है' या सिनेमातही सहायक भूमिकेतच दिसली. रिंकी खन्ना शेवटची 'चमेली' सिनेमात झळकली होती.
5 / 9
रिंकीने बॉलिवूडमध्येही करिअर करण्याचा प्रयत्न केला,पण तिच्या प्रयत्नांचा हवे तसे यश मिळाले नाही.
6 / 9
त्यानंतर तिने फेब्रुवारी 2003 मध्ये व्यावसायिक समीर सरनशी लग्न केले. लग्नानंतर रिंकी खन्नाने बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला.
7 / 9
लग्नानंतर रिंकी पती समीर सरनबरोबर लंडनमध्ये स्थायिक झाली आणि दीड वर्षानंतर ऑक्टोबर 2004 मध्ये तिने पहिल्या बाळाला जन्म दिला.
8 / 9
रिंकीच्या मुलीचे नाव नाओमिका आहे. मुलीच्या जन्माच्या 9 वर्षानंतर रिंकी 2013 मध्ये पुन्हा आई बनली आणि मुलाला जन्म दिला.
9 / 9
रिंकी अनेक वर्ष इंडस्ट्रीपासून दूर आणि संसारात रमली. रिंकीला खन्ना लाइमलाइटमध्येही राहणे तिला आवडत नाही. गेली अनेक वर्ष ती आपलं वैवाहिक आयुष्य ती एन्जॉय करतेय.
टॅग्स :ट्विंकल खन्नाराजेश खन्नाडिम्पल कपाडिया