Join us

... तोपर्यंत तुमची आठवण येत राहिल; लाडक्या सुनेनं जागवल्या भावुक आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 1:13 PM

1 / 10
महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी. देशभरातून विलासराव यांच्या आठवणी जागवत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
2 / 10
विलासराव देशमुख यांचं १४ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. आजारापणामुळे त्यांचे अकाली निधन झाल्याने महाराष्ट्र हळहळला होता.
3 / 10
लातूर जिल्ह्याच्या बाभूळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा प्रेरणादायी प्रवास त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणाता बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
4 / 10
विलासराव यांची आज १२ वी पुण्यतिथी असून सोशल मीडियातूनही काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहत आहेत.
5 / 10
कुटुंबवात्सल्य लोकनेते अशीही त्यांची ओळख होती. विलासराव यांना तिने मुले आणि तीन सुना. मात्र, तिन्ही सुना त्यांच्यासाठी मुलींप्रमाणेच होत्या. त्यामुळे, सुनांनाही वडिल गेल्याचं दु:ख विलासरावांच्या निधनाने झालं.
6 / 10
दाक्षिणात्य अभिनेत्री जेनेलिया डिसुझा ही विलासरावांची सुन आणि अभिनेता रितेश देमुखखची पत्नी. जेनिलिया आणि विलासरावांचेही नाते बाप अन् मुलीसारखेच होते. आज जेनलियानेही आठवणी जागवत श्रद्धांजली वाहिली आहे.
7 / 10
जिनिलियाने सासरे विलासराव यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जिनिलियाने त्यांच्यासोबतचा लग्नातील एक फोटो शेअर केला.
8 / 10
या फोटोसह जेनिलायने भावूक संदेश लिहिला आहे. 'प्रिया बाबा, मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की, तुम्ही खूप चांगले आहात, तुमचा विचार करायला आम्हाला आवडतं.
9 / 10
पण तुमच्याशिवाय आयुष्य जगणं हे खूप कठीण आहे. मला माहितीये तुम्ही जिथे कुठे आहात ती जागा नक्कीच खूप खास असली पाहिजे.
10 / 10
तुमच्यात ती ताकद आहे. ज्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकता. आम्हाला तुमची खूप आठवण येते. तोपर्यंत येत राहिल, जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही, अशी भावूक पोस्ट जेनिलियाने लिहिली आहे.
टॅग्स :रितेश देशमुखबॉलिवूडराजकारणमुख्यमंत्री