Join us  

Uorfi Javed : आलिशान आयुष्य जगते उर्फी जावेद, आहे कोट्यवधींची मालकीण; महिन्याला कमावते तब्बल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 4:02 PM

1 / 12
उर्फी जावेदची ओळख सर्वांनाच माहीत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इतकंच नाही तर उर्फी तिच्या विचित्र फॅशनमुळे सतत चर्चेत असते. सर्वांचं लक्ष वेधून घेते.
2 / 12
उर्फी रोज तिच्या आउटफिट्समध्ये काही नवे प्रयोग करताना दिसते. सध्या उर्फी जावेद तिच्या जीवनावर आधारित 'फॉलो कर लो यार' या सीरीजमुळे चर्चेत आहे. उर्फीसोबतच तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही या सीरीजमध्ये दिसत आहेत.
3 / 12
छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी उर्फी जावेद आता आपल्या हटके स्टाईलने लोकप्रिय झाली आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिला ब्रेकअपनंतर झालेल्या त्रासामुळे आत्महत्या करावीशी वाटली.
4 / 12
अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर उर्फी जावेदने हिंमत हारली नाही आणि इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशच्या लखनौची असून तिचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी झाला. तेथेच तिने शिक्षण पूर्ण केलं.
5 / 12
आज उर्फी खूप आलिशान आयुष्य जगते. इन्स्टाग्रामवर उर्फीचे असंख्य चाहते आहेत, तिचे फोटो आणि रील चाहत्यांना खूप आवडतात. तिचे मिलयन्समध्ये फॉलोअर्स आहेत.
6 / 12
'बडे भैया की दुल्हनिया', 'मेरी दुर्गा', 'तेढी मेढी फॅमिली' यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेल्या उर्फी जावेदने अभिनयातही आपलं कौशल्य देखील दाखवलं आहे.
7 / 12
उर्फीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला खरी ओळख बिग बॉस ओटीटीमधून मिळाली. उर्फी जावेदची रोजची कमाई लाखोंमध्ये आहे.
8 / 12
रिपोर्ट्सनुसार उर्फी जावेदच्या कमाईचा सर्वात मोठा सोर्स हा सोशल मीडिया आहे. मिलियनमध्ये तिचे फॉलोअर्स असल्याने ती एक लोकप्रिय इन्फ्युएन्सर झाली आहे. त्यामुळेच अनेक मोठे ब्रँड तिच्यासोबत कोलॅब करतात.
9 / 12
ब्रँड कोलॅबमधून अभिनेत्री मोठी कमाई करते. याशिवाय उर्फी जावेद रिॲलिटी शो आणि गेस्ट अपीयरियन्समधूनही भरपूर पैसे कमावते.
10 / 12
मिळालेल्या माहितीनुसार, उर्फी महिन्याला तब्बल २ कोटी रुपये कमावते. तसेच उर्फीची एकूण संपत्ती १७२ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
11 / 12
आपल्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे अजब फोटो शेअर करत असते.
12 / 12
टॅग्स :उर्फी जावेदटिव्ही कलाकार