रंगीलाच्या 'तनहा तनहा' गाण्यात उर्मिलाने घातले होते 'या' अभिनेत्याचे अंतर्वस्त्र, अभिनेत्रीनेच केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 11:36 AM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री एकेकाळी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होती. जवळपास सर्वच सुपरस्टारसोबत तिने वेगवेगळ्या सिनेमात काम केलंय. तिच्या अनेक भूमिका गाजल्या. पण यात तिची 'रंगीला' सिनेमातील भूमिका सर्वात खास आहे. उर्मिलाचा विषय निघाला की, रंगीलाचा विषय निघणारच. तिला रंगीला गर्ल म्हणूनच ओळखलं जातं. उर्मिलाने आपला अभिनय आणि बोल्डनेस दोन्हींनी आपली वेगळी छाप सोडली आहे. उर्मिलाने नुकतीच एका कॉमेडी शोमध्ये या सिनेमाशी संबंधित एक कधीही न समोर आलेलं सीक्रेट सांगितलं आहे.2 / 8शोच्या स्पेशल एपिसोडमध्ये उर्मिलाने सांगितलं की, सिनेमातील एका गाण्यासाठी तिने अभिनेता जॅकी श्रॉफची बनियान घातली होती. उर्मिला म्हणाली की, 'कुणालाही माहीत नाही, पण मी जॅकी श्रॉफची बनियान रंगीला सिनेमातील 'तनहा तनहा' गाण्यात घातली होती. हे फारच मजेदार होतं'.3 / 8'हा सीक्वेन्स यूनिक करायचा होता आणि आम्हाला विचार करून किंवा रिसर्च करून काहीही नवीन करण्यास मनाई करण्यात आली होती. आम्हाला हा सीन नॅच्युरल करायचा होता आणि जेव्हा आम्हाला गाण्याच्या कॉस्च्युमबाबत सांगण्यात आलं तेव्हा जॅकीने मला त्याची बनियान घालण्यास सांगितलं'.4 / 8'मला थोडा डाउट होता. पण मी ती घातली आणि सर्व देवाच्या हाती सोडलं. खरंच मला खूप प्रेम मिळालं आणि कौतुक करण्यात आलं. एकंदर काय तर याचा अंत चांगला झाला'.5 / 8'तनहा तनहा यहां पे जीना ये कोई बात है' गाण्यात उर्मिला समुद्र किनारी स्लो मोशनमध्ये धावताना दिसते. तिचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक कमाल करून गेला होता. गाण्यात तिच्या कॉस्च्युमने खरंच नॅच्युरल टच दिला होता'.6 / 8शोमध्ये फराह खान हीनेही रंगीला गाण्यातील या सीक्रेटवर हैराणी व्यक्त केली. ती म्हणाली की, 'मला खरंच हे माहीत नव्हतं. पण मला हे म्हणावं लागेल की, उर्मिला या सीक्वेन्समध्ये फारच हॉट दिसत होती आणि हा एक आयकॉनिक सीन बनला होता. जॅकीची बनियान घालून शूट करणं उर्मिलासाठी फारच स्पोर्टिंग होतं'.7 / 8उर्मिलाने शोमध्ये रंगीला सिनेमातील आणखी एक खास बाब सांगितली. ती म्हणाली की, रंगीलाच्या टायटल ट्रॅकची ओपनिंग उर्मिलाने आदित्य नारायणसोबत केली होती. त्यावेळी आदित्य फारच लहान होता'.8 / 8ती म्हणाली की, 'आदित्यसोबत शूट करणं फारच मजेदार होतं. कारण तो लहान होता. त्याने जास्त रिटेक्सही दिले नव्हते. तो बालपणापासून फार टॅलेंटेड आणि गोड होता'. आणखी वाचा Subscribe to Notifications