आईने रागात घराबाहेर फेकून दिले होते उषाताईंचे सामान; फोटोंमधून जाणून घ्या ‘आऊ’चा फिल्मी प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 1:51 PM1 / 13 13 सप्टेंबर 1946 साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. 2 / 13 सदानंद कुलकर्णी हे त्यांच्या वडिलांचे नाव. उषाताईंच्या आई या शिक्षिका होत्या. 3 / 13उषा ताईंना एकुण चार बहीण भावंड. त्यांची एक बहीण बँकेत नोकरी करते. त्यांना एक भाऊ असून तो मुंबईत असतो़ उषाताईंना आणखी एक भाऊ होता. पण 1975 साली त्यांचे निधन झाले होते. 4 / 13उषाताईंना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. सार्वजनिक गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात त्या सहभागी होत असत. मात्र, मात्र त्यांच्या आईचा अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विरोध होता.5 / 13उषाताईंनी अभिनय करु नये, असे त्यांच्या आईचे म्हणणे होते. पण उषा ताईंना बालपणीच कलेची आवड निर्माण झाली. 6 / 13 एकदा तर उषाताईंच्या आईंनी रागात त्यांचे सामान घराबाहेर फेकून दिले होते. 7 / 13आईने घरातून हाकलून दिल्यानंतर उषाताई मैत्रिणीकडे राहायला गेल्या होत्या. पण नंतर त्यांचे वडील त्यांना समजावून घरी परत घेऊन आले होते. उषाताईंनी स्वत: हा किस्सा होम मिनिस्टर या कार्यक्रमात सांगितला होता.8 / 13चौथ्या वर्गात असताना उषाताईंनी पहिल्यांदा मंचावर नृत्य सादर केले होते. मोठे झाल्यानंतर त्यांची अभिनयातील रुची अधिक वाढू लागली.9 / 13 एक बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना ओळखले जाते. 10 / 131979 साली आलेला ‘सिंहासन’ हा उषाताईंचा पहिला सिनेमा. या चित्रपटात त्यांनी शांताबाईची भूमिका साकारली होती.11 / 13‘माहेरची साडी’ या चित्रपटात उषाताईंनी रंगवलेली खाष्ट सासूची भूमिका जबरदस्त गाजली. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अशाच प्रकारच्या भूमिका साकारल्या. 12 / 13मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी सिनेमातही त्यांनी काम केले. अनेक मालिका व नाटकांमध्येही त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला.13 / 13आज उषा यांना ‘आऊ’ या नावाने सगळे ओळखतात. ‘नशिबवान’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान उषा नाडकर्णी यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. तो त्यांना आऊ अशी हाक मारत असत. त्यामुळं संपूर्ण क्रू, सेटवरील सगळी मंडळी उषा नाडकर्णी यांना आऊ.. आऊ अशी हाक मारू लागले. आता त्या याच नावाने जास्त ओळखल्या जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications