कधीकाळी नाईट क्लबमध्ये गायच्या उषा उत्थुप, जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2020 8:00 AM1 / 10उषा उत्थुप हे नाव उच्चारले तरी एक सळसळत्या उत्साहाचा भास होतो. आज उषा उत्थुप यांचा वाढदिवस.2 / 10भरजरी कांचीपुरम साडी, केसांत गजरा, कपाळावर भली मोठी बिंदी लावून रॉक, जॅझ गाणाºया उषांची वेषभुषा आज एक ट्रेडमार्क झाला आहे. आधी उषा यांच्या बिंदीचा साइज तुलनेने लहान होता. गेल्या काही वर्षांत त्यांच्या लूकमध्ये प्रचंड बदल झाला.3 / 10 एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात उषा यांचा जन्म झाला. त्यांना गाण्याची प्रचंड आवड होती. पण त्यांनी कधीच गाण्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नाही.4 / 10घरचे वातावरण कर्मठ असूनही 20 वर्षी चेन्नईच्या एका नाईट क्लबमध्ये गाण्यासाठी त्या उभ्या राहिल्या.5 / 10साडी नेसून चेन्नईच्या माऊंट रोडस्थित जेम्स नामक एका लहानशा नाईटक्लबमध्ये त्यांनी गाण्याची कारकिर्द सुरु केली. नाईट क्लबच्या मालकाला त्यांचा आवाज आवडला आणि त्याने उषा यांना आणखी आठवडाभर थांबण्याची विनंती केली.6 / 10यानंतर उषा यांनी मुंबईच्या ‘टॉक आॅफ द टाऊन’ आणि कोलकात्याच्या ‘ट्रिनकस’ यासारख्या नाईट क्लबमध्ये गाणे सुरु केले. यानंतर दिल्लीच्या ओबेरॉय हॉटेलातही त्यांनी गायले.7 / 10याच ओबेरॉय हॉटेलमध्ये उषा यांची भेट अभिनेते शशी कपूर यांच्याशी झाली. उषांचे गाणे ऐकून ते इतके मंत्रमुग्ध झाले की, त्यांनी उषा यांना चित्रपटात गाण्याची संधी दिली.8 / 101970 मध्ये उषा यांनी ‘बॉम्बे टॉकिज’ या सिनेमात एक इंग्रजी गाणे गायले आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.9 / 10शालीमार, शान, वारदात, प्यारा दुश्मन, अरमान, दौड, डिस्को डान्सर, भूत, जॉगर्स पार्क अशा अनेक सिनेमांत त्यांनी गाणी गायली.10 / 10विशाल भारद्वाज यांच्या ‘सात खून माफ’ या सिनेमात त्यांनी गायलेले ‘डार्लिंग’ हे गाणे तर तुफान गाजले. आणखी वाचा Subscribe to Notifications