Join us  

हॉटेलमध्ये करायची काम, २३ वेळा हिरोला किस केल्याने चर्चेत; आता आहे कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 4:28 PM

1 / 11
बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी प्रत्येकाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात. फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्रीनेही यशस्वी होण्यासाठी बराच काळ संघर्ष केला आहे. एकेकाळी ती हॉटेलमध्येही काम करायची. तिच्याबद्दल जाणून घेऊया...
2 / 11
वाणी कपूर असं या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे. वाणीने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा यांच्यासोबत 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
3 / 11
वाणी हा दिल्लीची रहिवासी आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. तिचे वडील शिव कपूर हे फर्निचर एक्स्पोर्टचा व्यवसाय करतात आणि आई डिम्पी कपूर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते.
4 / 11
वाणी कपूरने टूरिझममध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केल्यानंतर जयपूरमधील ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये इंटर्नशिप केली. यानंतर अभिनेत्रीनेही या हॉटेलमध्ये बराच काळ काम केलं होतं.
5 / 11
पण त्यानंतर वाणीने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला. तिचे वडील याच्या पूर्णपणे विरोधात होते. पण तरीही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने संघर्ष केला.
6 / 11
मॉडेलिंगमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर वाणी कपूर मुंबईत आली. एका पाठोपाठ एक ऑडिशन्स देत होती. त्यानंतर तिला ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा चित्रपट मिळाला. ज्यातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.
7 / 11
या चित्रपटानंतर वाणीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण रणवीर सिंहसोबतच्या 'बेफिक्रे' या चित्रपटाने ती सर्वाधिक चर्चेत आली. कारण या चित्रपटात दोघांनी एकदा, दोनदा नव्हे तर २३ वेळा लिपलॉक केलं होतं.
8 / 11
वाणी कपूर सध्या तिच्या 'खेल खेल में' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.
9 / 11
अभिनेत्री १८ ते २० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिची सर्वाधिक कमाई ही चित्रपट, मॉडेलिंग आणि जाहिरातीतून होते.
10 / 11
वाणी कपूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत.
11 / 11
टॅग्स :वाणी कपूरबॉलिवूडटिव्ही कलाकार