PICS : नताशाला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता वरूण धवन, फिल्मी आहे लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 12:05 PM1 / 10येत्या 24 जानेवारीला अभिनेता वरूण धवन त्याची बालपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत अलीबागेत लग्नगाठ बांधतोय. या लग्नाच्या चर्चा जोरात आहेत. नताशा व वरूणची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 10तर या लव्हस्टोरीची सुरुवात झाली ती वरूण व नताशा सहावीत शिकत असताना.3 / 10होय, सहाव्या वर्गात असताना नताशा व वरूण पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.4 / 10शाळेत दोघांचीही चांगली गट्टी झाली. मग दोघेही चांगले मित्र बनलेत. 12 व्या वर्गापर्यंत दोघे मित्र होते.5 / 10दोघेही मानेकजी कूपर स्कूलमध्ये शिकते. वरूण रेड हाऊसमध्ये होता आणि नताशा यॅलो हाऊसमध्ये. दोघेही एकत्र बॉस्केटबॉल खेळायचे.6 / 10नताशा वरूणला फक्त आणि फक्त मित्र मानत होती. पण वरूण कधीच नताशाच्या प्रेमात पडला होता. एकदा लंचब्रेकदरम्यान वरूणला नताशा दूरून चालत येताना दिसली आणि त्या क्षणालाच तो तिच्या प्रेमात पडला.7 / 10तुम्हाला आश्चर्य वाटेल पण, नताशाने वरूणला तीन-चारदा रिजेक्ट केले होते. पण वरूणने हार मानली नाही. तो प्रयत्न करत राहिला आणि अखेर त्याचा प्रेमप्रस्ताव नताशाने स्वीकारला.8 / 10नताशा एक फॅशन डिझाईनर आहे. न्यूयॉर्कमध्ये ती फॅशन डिझाईन शिकलीय.9 / 10ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबधित असूनही नताशा लाईमलाइटपासून दूर राहणे पसंत करते.10 / 10करिअरच्या सुरुवातीला वरूणने नताशासोबतचे रिलेशनशिप लपवून ठवेले. पण अखेर कालांतराने ही लव्हस्टोरी सगळ्यांना कळलीच. आणखी वाचा Subscribe to Notifications