Vicky Katrina Wedding Anniversary : 'विकी कॅटरिना'च्या लग्नाला १ वर्ष पूर्ण; राजस्थानच्या शाही पॅलेसमध्ये झाला होता विवाहसोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 11:08 AM1 / 8९ डिसेंबर २०२१ ला विकी कॅटरिनाने राजस्थान येथे डेस्टिनेशन वेडिंग केले. अगदी मोजक्या पाहुण्यांसह हा शाही विवाहसोहळा पार पडला. 2 / 8राजस्थानसारख्या सुंदर, ऐतिहासिक ठिकाणी सवाई माधोपुरमध्ये सिक्स सेन्सेस किला बरवारा येथे त्यांनी लग्न केले. 3 / 8तीन दिवसांच्या या विवाहसोहळ्यात हळद, मेहेंदी, संगीत असे सर्व फंक्शन होते. या सोहळ्याचे फोटोही प्रायव्हेट ठेवण्यात आले होते. 4 / 8लग्नानंतर कॅटरिनाने पहिल्यांदा विकी साठी शिरा बनवला होता त्याचे फोटो शेअर केले होते. 5 / 8लग्नानंतर त्यांचे सिक्स सेन्सेस फोर्ट येथे सूर्यप्रकाशात केलेले फोटोशुट खुप व्हायरल झाले. अतिशय राजेशाही थाटात त्यांचे हे फोटोशुट होते.6 / 8कॅटरिनाने लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेला लहंगा घातला होता. लाल रंगाच्या लहंग्यामध्ये कॅटरिना खुपच सुंदर दिसत होती. 7 / 8विकीचा लुकही खुप फ्रेश होता. गुलाबी रंगाचा फेटा, ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी असा विकीचा लुक होता8 / 8बघता बघता आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications