Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कोणत्या धर्म पद्धतीने होणार विकी-कतरिनाचं लग्न? Vickat च्या लग्नाबाबत महत्वाचा खुलासा.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 12:12 PM1 / 10बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला विकी-कतरिनाच्या लग्नसोहळ्याला अवघा एक दिवस बाकी राहिला आहे. ९ डिसेंबर रोजी ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 2 / 10राजस्थानमधील माधोपूरा जिल्ह्यातील फोर्ट बरवारा येथे मोठ्या थाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांकडे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.3 / 10सध्या सोशल मीडियावर या लग्नाविषयी अनेक अपड्टेस समोर येत असून नवनवीन खुलासे होत आहेत.4 / 10विकी-कतरिनाचा विवाहसोहळा मोठ्या राजेशाही थाटात होणार आहे. अगदी पाहुण्यांच्या स्वागतापासून ते त्यांच्या जेवणापर्यंत अनेक गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आलं आहे. 5 / 10या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावणार असून अनेक सेलिब्रिटी आता राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. 6 / 10सोशल मीडियावर येत असलेल्या अपड्टेसमध्येच आता या दोघांच्या लग्नाच्या पद्धतीविषयी चर्चा रंगली आहे.7 / 10विकी हिंदू असून कतरिना ख्रिश्चन आहे. त्यामुळे या दोघांनी लग्नासाठी नेमकी कोणती धर्म पद्धती निवडली हे जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. 8 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना हिंदू व ख्रिश्चन या दोन्ही धर्म पद्धतीनुसार लग्न करणार आहेत.9 / 10 प्रथम या दोघांचा हिंदू पद्धतीने लग्नसोहळा होईल व त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनेदेखील ते लग्नगाठ बांधणार आहेत.10 / 10सध्या कतरिना तिच्या हळदी, संगीत आणि मेहंदी सोहळ्यात बिझी आहे. कतरिनाच्या हातावर खास राजस्थानमधील प्रसिद्ध मेहंदी लागणार आहे. या मेहंदी सोहळ्यासाठी जवळपास ४०० मेहंदीचे कोन मागवण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications