Vicky-Katrina Wedding: आलिया भट्ट, प्रियांका चोप्राने दिल्या कपलला शुभेच्छा, म्हणाल्या - मेरे यार की शादी है By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:44 AM1 / 7Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding: विकी कौशल आणि कतरिना कैफ हे गुरूवारी ९ डिसेंबर लग्न बंधनात अडकले. त्यानंतर त्यांनी लग्नाचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो समोर आल्यावर कपलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या फोटोंवर प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण, करण जोहरसहीत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा कोण काय म्हणालं...2 / 7बॉलिवूडमधील या वर्षाच्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या लग्नाचा बार अखेर गुरूवारी उडालाच. तेव्हापासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियावर सर्वांनी त्यांचे फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.3 / 7करण जोहरने या कपलला शुभेच्छा देत लिहिलं की, 'या सुंदर जोडप्याला खूप शुभेच्छा! @katrinakaif आणि @vickykaushal09! तुम्हा दोघांना अनेक दशकं खूप आनंद आणि सूख मिळावं ही इच्छा...माझं प्रेम आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत आहे....'.4 / 7आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कपलचा फोटो शेअऱ केला आणि त्यासोबत लिहिलं की, 'दोघांनाही शुभेच्छा'. तिने सोबतच लिहिलं की, 'आनंदाचे अश्रू'.5 / 7करिना कपूर खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर विकी-कतरिनाच्या लग्नाचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'प्रेमाची ताकद'.'तुम्हा दोघांना शुभेच्छा'. 6 / 7नवरी-नवरदेवाचा फोटो पोस्ट करत असताना क्रिती सेननने लिहिलं की, 'शुभेच्छा हो @Katrina and @vickykaushal09!! तुम्ही सुंदर दिसत आहात. तुम्हा दोघांच्या जीवनात आनंद आणि प्रेमाची कामना'.7 / 7प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्नाचा फोटो शेअर केला आणि लिहिलं की, 'तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा'. तिने खाली हॅशटॅग #MereYaarKiShaadiHai असंही लिहिलं. आणखी वाचा Subscribe to Notifications