Join us  

IN PICS : विकी-कतरिनानं लग्नावर करोडो रूपये खर्च केलेत अन् करोडो छापले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 1:23 PM

1 / 7
विकी कौशल व कतरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा अद्यापही सुरू आहे. होय, हे लग्न बॉलिवूडच्या आत्तापर्यंतच्या महागड्या लग्नांपैकी एक होतं. लग्नावर अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला गेला. अर्थात विकी व कॅटनं जितका पैसा खर्च केला, तितका कमावलाही....
2 / 7
होय, विकी व कॅटने आपल्या लग्नातून कोट्यावधी रूपये कमावले. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, स्टार कपलने अ‍ॅमेझॉन प्राईम इंडियासोबत एक डील साईन केली आहे. या डीलनुसार, विकी व कॅटने लग्नाच्या व्हिडीओचे फुटेज एकूण 80 कोटी रूपयांत विकले आहेत.
3 / 7
रिपोर्टनुसार, लग्नाचे काही खास फोटो एका मोठ्या मॅगझिनला विकून विकी व कॅटने 10 कोटी रूपयांची कमाई केली आहे. लग्नाचे व हळदीचे काही मोजके फोटो कपलने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण याशिवायही काही स्पेशल फोटो संबंधित मॅगझिनमध्ये प्रकाशित होणार आहेत.
4 / 7
लग्नानंतर विकी व कतरिना यांना एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेतच. अशात या कपलला एकत्र आॅफर्स येणं सुरू झाल्याचंही कळतंय. चर्चा खरी मानाल तर स्टार कपलने एकत्र चित्रपट साईन केला आहे. 20 कोटी रूपयांत ही डील फायनल झाल्याचं वृत्त आहे.
5 / 7
तुम्हाला ठाऊक आहेच की, कतरिना एका सिनेमासाठी 15 कोटी रूपये घेते तर विकी कौशल एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी फी घेतो.
6 / 7
फिल्म इंडस्ट्रीत कतरिना विकीला बरीच सीनिअर आहे. संपत्तीच्या बाबतीतही ती विकीपेक्षा वरचढ आहे. होय, कतरिनाची नेटवर्थ 220 कोटी आहे.
7 / 7
विकीचं म्हणाल तर त्याची संपत्ती 24 कोटींच्या घरात आहेत. विकी कतरिनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.
टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल