Join us

विकी कौशलला एक ‘गंभीर’ आणि एक ‘सुंदर’ आजार, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 10:59 AM

1 / 9
नव्या दमाचा, नव्या पिढीचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal ) याचा आज वाढदिवस़ विकीबद्दल चाहत्यांना सगळे काही ठाऊक आहे. पण त्याच्या आजारपणाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का?
2 / 9
होय, विकीला ‘गंभीर’ आणि ‘सुंदर’ असे दोन आजार आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. खुद्द विकीने याचा खुलासा केला होता.
3 / 9
सर्वात आधी त्याच्या गंभीर आजाराबद्दल. तर सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना विकीने त्याच्या ‘गंभीर’ आजाराबद्दल सांगितले होते.
4 / 9
मला स्लीप पॅरालिसिस हा आजार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आजाराला मी तोंड देत आहे. मी खूप थकलेलो असेल तर मला याचा त्रास होतो. या आजारात तुमचे मन जागे झालेले असते. पण शरीर निद्रावस्थेतच असते. तुम्ही तुमचे हात-पाय हलवू शकत नाही. बोलण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. तुमच्या मानगुटीवर जणू कोणीतरी बसले आहे असे जाणवते. ही अवस्था काही सेकंदासाठी असते. पण यात प्रचंड भीती वाटते, असे त्याने सांगितले होते.
5 / 9
या आजारामुळे हॉरर सिनेमे पाहण्याची विकीला प्रचंड भीती वाटते. मी जगातला सर्वात भित्रा व्यक्ती आहे़, असे तो म्हणतो ते याचमुळे.
6 / 9
आता विकीचा ‘सुंदर’ आजार कोणता? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर त्याचाही खुलासा त्याने स्वत: केला होता.
7 / 9
हिरो असो वा हिरोईन वजनाचा काटा जराही पुढे सरकू नये, यासाठी कडक डाएट फॉलो करावे लागते. आवडत्या खाद्यपदार्थांवर पाणी सोडावे लागते. केवळ इतकेच नाही अनेक तास जिममध्ये घाम गाळावा लागतो. पण विकी कौशल हा मात्र याला अपवाद म्हणायला हवा. याचे कारण म्हणजे, त्याला असलेला एक ‘सुंदर’ आजार.
8 / 9
होय, खुद्द विकीने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. मला वजन न वाढण्याचा ‘सुंदर’ आजार असल्याचे त्याने सांगितले होते. ‘उरी’साठी विकीला 15 किलो वजन वाढवायचे होते. ‘राजी’चे शूटींग सुरु असताना त्याला या चित्रपटाची आॅफर आली होती. त्यावेळी त्याचे वजन 77 किलो होते. यानंतर त्याने 90 किलोपर्यंत वजन वाढवले. पण ते वाढवण्यासाठी त्याला प्रचंड कष्ट पडले. कारण त्याला वजन न वाढण्याचा ‘सुंदर’ आजार आहे. काहीही खा, त्याचे वजन वाढत नाही.
9 / 9
‘उरी’ संपल्यानंतर तो एकही दिवस जिममध्ये गेला नाही. यादरम्यान त्याने खूप जंक फूड, पिज्जा, पास्ता असे सगळे खाल्ले. पण त्याचे वजन वाढण्याऐवजी ८ किलो घटले. त्यामुळे हा खरोखरच चांगला आजार आहे,असे विकी म्हणाला होता.
टॅग्स :विकी कौशल