41 वर्षांची झाली कॅट! विकी कौशलने शेअर केली रोमँटिक पोस्ट; सहाव्या फोटोने वेधलं लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:33 PM1 / 7बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफची (Katrina Kaif) . विकी कतरिनाचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्रेमाने त्यांना 'विकॅट'असं नावंही पडलंय.2 / 7कतरिना कैफ आज 41 वर्षांची झाली आहे. विकी कौशलहून ती 4 वर्षांनी मोठी आहे. वाढदिवसानिमित्ताने कतरिनाने कर्नाटकात जाऊन स्वामी कोरगज्जा यांचं दर्शन घेतलं. 3 / 7बायकोच्या वाढदिवसानिमित्त विकीने बायकोसोबतचे खास फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुझ्यासोबत आठवणी बनवणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात आवडता भाग आहे. हॅपी बर्थडे माय लव्ह.' असं त्याने कॅप्शन दिलं आहे.4 / 7विकी आणि कतरिना दोघांची देवावर श्रद्धा आहे. एका ठिकाणी पूजा करतानाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे.5 / 7तसंच एकमेकांसोबत पिझ्झा खातानाचाही फोटो त्याने पोस्ट केला आहे. यामध्ये दोघंही हसत हसत आनंद घेत एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.6 / 7विकीच्या या फोटो अल्बममध्ये कॅटच्या या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. कतरिना कारमध्ये झोपली असून खूपच केविलवाणी दिसत आहे. तर विकीने लहान बाळासारखं तिच्या हनुवटीला पकडलं आहे. 7 / 72021 साली विकी आणि कतरिना लग्नबंधनात अडकले. राजस्थानमधील भव्य पॅलेसमध्ये त्यांनी सातफेरे घेतले. जेव्हा दोघांचा हात कायमचा एकमेकांच्या हातात आला हा लग्नातील खास क्षणही विकीने शेअर केला आहे . आणखी वाचा Subscribe to Notifications