'12th Fail' मुळे चमकले विक्रांत मेसीचे नशीब, असा पदरी पडला सुपरहिट सिनेमा! By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 6:01 PM1 / 10विधु विनोद चोप्रा यांच्या 12th Fail या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. या सगळ्यात सर्वाधिक कौतुक झालं ते आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीचं. 2 / 10 '12th Fail' हा 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. विक्रांतनं जीव ओतून साकारलेलं ते पात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेलं.3 / 10'12 वी फेल' या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. त्यांचं कौतुक करताना चाहते आणि सेलिब्रेटी थकत नाही आहेत. 4 / 1069th फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 12th फेल हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. विक्रांत मेसीला क्रिटिक्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर विधु विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.5 / 10नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी विक्रांतची मुख्य भूमिकेसाठी निवड का केली याचा खुलासा केला.6 / 10 विधू विनोद चोप्रा यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, 'राजकुमार हिरानी यांनी मनोज कुमार शर्माच्या भूमिकेसाठी विक्रांतचे नाव सुचवले होते.7 / 10राजकुमार हिरानी यांच्यामुळेच विक्रांतच्या पदरी हा सिनेमा पडला. मिळालेल्या संधीचं सोनं विक्रातंन करुन दाखवलं. 8 / 10 '12th Fail'या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांच्याशिवाय अनंत व्ही जोशी आणि अंशुमन पुष्कर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे. 9 / 10आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची ही कथा आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्था, लोकांची विचारसरणी आणि व्यवस्थेवरही हा सिनेमा भाष्य करतो. 10 / 10विक्रांत 'दिल धडकने दो', 'अ डेथ इन द गुंज' आणि 'छपाक' सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम केलं. सिनेमा नाही तर विक्रांतनं वेबसीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. 'मिर्झापूर' आणि 'क्रिमिनल जस्टिस' सारख्या वेबसीरिजमधून त्याची लोकप्रियता आणखी वाढली. आणखी वाचा Subscribe to Notifications