Join us

'यश मिळालं पण मी संतुष्ट नव्हते', विद्या बालन असं का म्हणाली? करिअरबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 3:09 PM

1 / 7
बॉलिवूडमध्ये अतिशय प्रभावशाली अभिनेत्री म्हणून ओळख असलेली विद्या बालन (Vidya Balan) ४ वर्षांनंतर सिनेमात पुनरागमन करत आहे. 'नीयत' सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही एक मर्डर मिस्ट्री असून विद्या बालन डिटेक्टिव्ह असणार आहे.
2 / 7
विद्याने 'कहानी', 'इश्किया' सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. परिणीता सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. विद्या बालन इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून आहे आणि मोजकेच पण अप्रतिम भूमिका करत आहे. एका कार्यक्रमात ती आपल्या करिअरविषयी बोलली. यावे ळी तिने मोठा खुलासा केला.
3 / 7
विद्याने करिअरच्या सुरुवातीला ज्या भूमिका केल्या त्यातून तिला यश तर मिळालं मात्र समाधान मिळालं नाही. ती सांगते,'मी सुरुवातीला अनेक रोमँटिक भूमिका केल्या. पण मला त्यातून समाधान मिळालं नाही. मला आणखी चांगलं काम करायचं होतं. मला असं वाटायचं की माझं काही योगदानच नाहीए.'
4 / 7
2010 साली आलेल्या 'इश्किया' सिनेमामुळे तिला समाधान मिळालं. या सिनेमामुळे तिला जाणवलं की अभिनेत्री म्हणून तिचा पुनर्जन्म झाला आहे. बऱ्याच दिवसांपासूनची तिची प्रतिक्षा संपली. यानंतर विद्याने मागे वळून बघितलं नाही.
5 / 7
विद्याने इंडस्ट्रीतील भेदभावाविषयीही बातचीत केली. जर एखादी महिला दिग्दर्शिका महिलांना क्रू मध्ये काम देते तर मला नाही वाटत त्यात काहीच गैर आहे. मी मिशन मंगल सारख्या सिनेमांमधून बदल बघितला आहे. आपण कोणालाही व्यक्तीच्या रुपात बघितलं पाहिजे ना की त्यांच्या लिंगावरुन ओळख ठरवली पाहिजे.
6 / 7
विद्याला अनेकदा तिच्या वजनावरुनही हिणवले गेले. २०१७ मध्ये 'तुम्हारी सुलू' सिनेमावेळी तिला वजनवाढीचा सामना करावा लागला. पण ट्रोलिंगला न जुमानता तिने सर्वांना सडेतोड उत्तरं दिली.
7 / 7
विद्या आता 'नीयत' पुन्हा आपल्या अभिनयाची छाप पाडायला तयार आहे. यामध्ये राम कपूर, राहुल बोस यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. तसंच चाहते विद्या बालनला बघण्यासाठी उत्सुक आहेत.
टॅग्स :विद्या बालनबॉलिवूडसिनेमा