Join us

Vidya Balan : मी देवाला प्रार्थना करायचे की एअरपोर्टवर..., विद्या बालन तिच्या दिसण्यावर खूप काही बोलली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 3:06 PM

1 / 10
फिल्म स्टार दोन प्रसंगी मनातून घाबरलेले असतात. एक म्हणजे, जेव्हा सिनेमा रिलीज होणार असतो आणि दुसरा म्हणजे, जेव्हा ते एअरपोर्टवर असतात. होय, स्टार्स ही गोष्ट कितीही नाकारत असले तरी हे सत्य आहे.
2 / 10
एअरपोर्टवर फोटोग्राफर्सच्या झुंडी उभ्या असतात. एखादा स्टार दिसला रे दिसला की, त्यांचे कॅमेरे क्लिक करायसाठी सरसावतात. अशावेळी स्टार्स मंडळींना आपल्या एअरपोर्ट लुककडेही विशेष लक्ष द्यावं लागतं. पण विद्या बालन याला अपवाद आहे.
3 / 10
आजच्या सोशल मीडिया काळात एअरपोर्ट लुक महत्त्वाचा झाला आहे. पण आताश: विद्या बालनला यामुळे काहीही फरक पडत नाही. अर्थात एकेकाळी एअरपोर्ट लुकमुळे ती प्रचंड दहशतीत असायची.
4 / 10
अलीकडे एका मुलाखतीत विद्या यावर बोलली. ती म्हणाली, सुरूवातीला मी एअरपोर्ट लुकबद्दल कमालीची काळजी घ्यायचे. शूट किंवा इव्हेंट नसला की मी मेकअपमध्ये नसायचे. मग काय अशावेळी एअरपोर्टवर फोटोग्राफर्स मिळू नयेत, अशी प्रार्थना देवाला करायचे.
5 / 10
पुढे ती म्हणाली, मी कारमध्ये लपायचे, जेणेकरून फोटोग्राफर्स मला बघू शकणार नाहीत. मी त्यांच्यामुळे सतत दहशतीत असायचे. पण आता मला याची पर्वा नाही. मी जशी आहे तशी आहे. वय आणि अनुभव यानुसार, कदाचित ही भावना तुमच्या मनात निर्माण होते.
6 / 10
द डर्टी पिक्चर’मध्ये विद्याने सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी विद्याने भरपूर वजन वाढवलं होतं. यानंतर काय तर तिचं वाढलेलं वजन चर्चेचा विषय ठरला होता. यावर एका मुलाखतीत विद्या बोलली होती.
7 / 10
माझं वाढलेजं वजन जणू राष्ट्रीय मुद्दा बनला होता. तो काळ माझ्यासाठी कठीण होता. मी माझाच तिरस्कार करू लागले होते. माझे वाढलेले वजन, त्यावरून होणारी टीका याचा माझ्या मनावर विपरित परिणाम झाला होता. माझं मानसिक स्वास्थ्य हरवलं होतं, असं ती म्हणाली होती.
8 / 10
आरशात पाहायलाही मला भीती वाटायची. माझ्या शरीराची लाज वाटायची. पण हळूहळू मी यातून बाहेर आले. अर्थात यातून बाहेर येणं इतकं सोपं नव्हतं. मात्र मी ते साध्य केलं. आता लोक मला काहीही म्हणोत, माझ्या वाढलेल्या वजनावर जोक्स करोत, मला ट्रोल करोत... आता कशाचाही माझ्यावर परिणाम होत नाही, असं ती म्हणाली होती.
9 / 10
मला कुठलेही फिल्मी बॅकग्राऊंड नव्हते. मीच माझे गुरु होते. मी पूर्वापार नेहमीच लठ्ठ मुलगी होते.मला सुरुवातीपासूनच हार्मोन्ससंबंधीच्या अडचणी आहेत. मला याचा राग यायचा. पण आताश: मी सगळं मान्य केलं आहे, असंही तिने सांगितलं होतं.
10 / 10
फिल्म इंडस्ट्रीत सतत सुंदर दिसण्याच्या नादात मी अनेकदा निराश व्हायचे. मी नैराश्यात जात होते. मात्र, कालांतराने मी ही गोष्ट मान्य केली. मला देवाने जे शरीर दिले आहे, तेच माझ्या जिवंतपणाची निशाणी आहे. आता मी माझ्या शरीरावर प्रेम करते. कारण हे शरीर माझे आहे. हे शरीर हेच माझं अस्तित्व आहे, असंही विद्या म्हणाली होती.
टॅग्स :विद्या बालनबॉलिवूड