Join us

पंगा नहीं लेने का...! विद्युत जामवालने व्लादिमीर पुतीन, बेयर ग्रिल्ससोबत या यादीत मिळवले मानाचे स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 4:31 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल एक दमदार अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. आता जगातील १० सर्वाधिक खतरनाक जिवंत योद्ध्यांच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
2 / 10
‘द रिचेस्ट’ या नामांकित वेब पोर्टलने संशोधन करुन जगातील १० सर्वाधिक खतरनाक जिवंत योद्ध्यांची एक यादी जाहिर केली आहे. या यादीत आता विद्युत जामवालचे नावही चढले आहे.
3 / 10
या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, द मेन वर्जेस वाइल्ड या शोचा होस्ट बेयर ग्रिल्स यांची नावे आहेत.
4 / 10
10 पीपल यू डॉन्ट वांट मेस विथ असे शीर्षक असलेल्या या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे नाव आहे. पुतीन तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ड थर्ड डन आहेत.
5 / 10
याशिवाय शिफू शी यन मिंग (शाओलिन एक्सपर्ट), विटो पिरबजारी (फिटनेस एक्सपर्ट), गीगा उगुरु (रियल लाइफ निंजा), हट्सुमी मसाकी (निंजा कुंगफू एक्सपर्ट), जेडी अँडरसन (आईस मॅन), मुस्तफा इस्माईल (बॉडी बिल्डर), मार्टिन लिचिस (वेट लिफ्टर), बेयर ग्रिल्स (वाइल्ड अ‍ॅडवेंचरर) यांचाही या यादीत सामावेश आहे.
6 / 10
या यादीत नाव असणारा विद्युत जामवाल पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे.
7 / 10
चित्रपटात बॉडी डबलचा वापर न करता विद्युत धोकादायक स्टंट स्वत: करतो. याचसाठी तो ओळखला जातो.
8 / 10
वयाच्या तिस-या वषार्पासून मार्शल आर्ट शिकणारा विद्युत कलरीपायट्टूमध्ये निपुण आहे.
9 / 10
कराटे, कुंगफू, जुडो, विनचिंग, फ्रि स्टाईल बॉक्सिंग, किक बॉक्सिंग यांसारख्या अनेक मार्शल आर्ट स्टाईल्सचा त्याने अभ्यास केला आहे.
10 / 10
ख-या आयुष्यात विद्युतशी कोणी त्याच्याशी पंगा घेतला तर काही मिनिटांत तो त्याला धुळ चारेल. याच विश्वासापोटी विद्युतची नोंद जगातील सर्वोत्कृष्ट जिवंत फायटर्समध्ये केली गेली आहे.
टॅग्स :विद्युत जामवाल