Join us

३० कोटींची संपत्ती अन् प्रायव्हेट जेट! अमाप संपत्ती असलेल्या विजय देवरकोंडा एकेकाळी होता कफल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 11:15 AM

1 / 10
सध्या प्रेक्षक वर्गामध्ये साऊथ सिनेमांची विशेष क्रेझ आहे. त्यामुळे साऊथमधील अनेक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत.
2 / 10
यामध्ये महेश बाबू, विजय देवरकोंडा, धनुष्य, अल्लू अर्जुन यांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. यामध्येच आज विजय देवरकोंडाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
3 / 10
९ मे १९८९ मध्ये हैदराबादमध्ये विजय देवरकोंडाचा जन्म झाला. २०११ मध्ये त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली.
4 / 10
नुव्विला या रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमामध्ये तो पहिल्यांदाच झळकला. मात्र, त्याला खऱी ओळख मिळाली ती अर्जुन रेड्डी या सिनेमामुळे.
5 / 10
एका सिनेमामुळे रातोरात सुपरस्टार झालेला विजय आज आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
6 / 10
आज विजयकडे अमाप यश, संपत्ती आहे. मात्र, एकेकाळी त्याने प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले.
7 / 10
३० कोटी रुपयांची अमाप संपत्ती असलेल्या या अभिनेत्याकडे चक्क घरभाडं भरायचेही पैसे नव्हते.
8 / 10
आज विजय वर्षाकाठी ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. तो एका सिनेमासाठी १० ते ११ कोटी रुपये मानधन घेतो.
9 / 10
विजय हैदराबादमधील जुबली हिल्स येथे राहत असून त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
10 / 10
विजय आजही त्याच्या आई-वडील आणि भावासोबत राहतो.
टॅग्स :विजय देवरकोंडासेलिब्रिटीसिनेमामहेश बाबूअल्लू अर्जुन