Join us

विक्रांत मेसी आहे गडगंज संपत्तीचा मालक, आकडा पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 2:56 PM

1 / 10
'12th Fail' फेम बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसीनं वर्षाच्या शेवटी त्यानं चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. अभिनयातून संन्यास घेणार असल्याची घोषणा त्यानं केली आहे.
2 / 10
कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असताना विक्रांतनं हा निर्णय नेमका का घेतला हे अद्याप समोर आलं नसलं तरी, चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यातच अभिनेत्याच्या नेटवर्थची चर्चा रंगू लागली आहे.
3 / 10
17 वर्षांच्या चमकदार अभिनय कारकिर्दीनंतर त्यांच्याकडे किती कोटींची मालमत्ता आहे आणि त्याच्या कार कलेक्शनविषयी आपण जाणून घेऊया.
4 / 10
आतापर्यंत विक्रांतने विविध टीव्ही शो, वेब सिरीज आणि चित्रपटांद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली छाप सोडली आहे. त्यामुळे त्याला एका दमदार अभिनेत्याचा टॅगही मिळाला आहे. प्रसिद्धीसोबतच विक्रांतने तगडा पैसाही कमावला आहे.
5 / 10
ई टाइम्सच्या अहवालावर आधारित, विक्रांतची एकूण संपत्ती सुमारे 20-26 कोटी रुपये आहे.
6 / 10
विक्रांत चित्रपट आणि जाहिरातींसाठी सुमारे 1-2 कोटी रुपये मानधन घेतो. . विक्रांतची बहुतेक कमाई चित्रपट आणि वेब शो तसेच ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया हँडलमधून येते.
7 / 10
2020 मध्येविक्रांतने मुंबईत एक आलिशान सी-फेसिंग घर विकत घेतले. येथे तो पत्नी शीतल ठाकूर आणि मुलगा वरदानसोबत राहतो.
8 / 10
सुपरस्टार म्हणून विक्रांत मॅसीला लक्झरी लाइफस्टाइल जगण्याचीही आवड आहे.
9 / 10
अभिनेत्याकडे महागड्या कार आणि बाईकचं कलेक्शन आहे.
10 / 10
ज्यामध्ये मर्सिडीज-बेंझ जीएलई रॅले, Volvo S90,Maruki Suzuki Dezire, ट्रायम्फ बोनविले बॉबर बाइक, डुकाटी मॉन्स्टर बाईकचा समावेश आहे.
टॅग्स :विक्रांत मेसीकार