Photos: कुर्ता फाड हल्दी...! Vikrant Masseyने शेअर केले हळदीचे धम्माल फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 3:38 PM1 / 8बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी गेल्या 18 तारखेला लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेन्ड शीतल ठाकूरसोबत त्याने लग्नगाठ बांधली.2 / 8या लग्नाचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता विक्रांत व शीतलच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.3 / 8विक्रांत व शीतलने हळदीत नुसती धूम केली. कुर्ता फाड हल्दी, असं लिहित विक्रांतने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.4 / 8 विक्रांत व शीतल सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 14 फेब्रुवारीला नोंदणी पद्धतीने विवाह केला आणि 18 तारखेला दोघंही पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकले.5 / 8विक्रांत व शीतलने 2019 मध्ये साखरपुडा केला होता. दोघंही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. कोरोना महामारीमुळे या कपलचं लग्न अनेकदा लांबणीवर पडलं होतं.6 / 8 लग्नाचा मुहूर्त अनेकदा पुढे ढकलला गेल्यानंतर दोघांनी इंटिमेंट वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. नुकताच विक्रांत शीतलसोबत नव्या घरात शिफ्ट झाला आहे. या गृहप्रवेशाचे फोटो विक्रांतने सोशल मीडियावर शेअर केले होते.7 / 8जून 2020 मध्ये, विक्रांतने शीतलसाठी एक भावुक करणारी पोस्ट लिहिली होती. शिवाय शीतल ठाकूरसोबतच्या नात्यावरही शिक्कामोर्तब केलं होतं. 8 / 8विक्रांत व शीतल ठाकूर यांनी ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’च्या पहिल्या सीझनमध्ये एकत्र काम केलं होतं. याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications