Join us

हिंदी-मराठी भजनं गाऊन व्हायरल झाली मैथिली ठाकूर; आजवर गायलं नाही एकही बॉलिवूड गाणं! हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:51 IST

1 / 7
लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकारांनी लोकांच्या मनामनात घर केलं. त्यातलीच एक गायिका म्हणजे मैथिली ठाकूर.
2 / 7
मैथिली ठाकूरने आजवर अनेक हिंदी-मराठी धार्मिक गाणी गाऊन लोकांचं मन जिंकलं. मैथिलीने गायलेलं प्रत्येक गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतं
3 / 7
मैथिलीला तिच्या या गायनप्रवासात तिच्या दोन्ही भावंडांची साथ आहे. ऋषभ ठाकूर आणि अयाची ठाकूर ही मैथिलीच्या भावंडांची नावंं आहेत.
4 / 7
मैथिलीने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडचं एकही गाणं गाणार नाही असा निर्णय घेतला. २०२० साली सुशांत सिंग राजपूतने जेव्हा स्वतःचं आयुष्य संपवलं त्यानंतर मैथिलीने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.
5 / 7
याशिवाय मैथिलीने काही वर्षांपूर्वी रामायणातील चौपाई गायलेली. त्या गाण्यावर टी सीरिजने कॉपीराईट हक्क सांगितल्याने मैथिलीला तो व्हिडीओ काढावा लागला.
6 / 7
यानंतर मैथिलीने टी-सीरिजबद्दल नाराजी दर्शवली होती. मैथिली लोकप्रिय गायिका असली तरीही ती आजवर तिच्या काही निर्णयांवर ठाम राहिलेली दिसते.
7 / 7
मैथिली ठाकूरला काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते नॅशनल क्रिएटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी मैथिलीने मोंदीसोबत व्हिडीओ शूट केला होता.
टॅग्स :बॉलिवूडमराठीमराठी गाणीनरेंद्र मोदी