Join us

रब ने बना दी जोडी..! विरुष्काने साजरा केला लग्नाचा वाढदिवस, 'स्टारकपल'च्या फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 10:41 AM

1 / 7
सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणजे विराट अनुष्का (Virat Kohli-Anushka Sharma). एकीकडे विराटने त्याच्या अद्भूत खेळाने भारतीयांचं मन जिंकलं आहे. तर दुसरीकडे अनुष्काने चांगल्या वाईट काळात विराटला दिलेली साथ नेहमीच कौतुकाचा विषय राहिली आहे.
2 / 7
विराट अनुष्का हे सध्याचं पॉवरकपल आहे. चाहत्यांनी त्यांना प्रेमाने 'विरुष्का' हे नाव दिलंय जे त्यांना अगदी शोभून दिसतं. दोघांच्या एकत्रित फोटोने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला असतो. कधी दोघंही एकत्र फोटो पोस्ट करतात याची चाहते वाट पाहत असतात.
3 / 7
कालच विरुष्काने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या सुखी संसाराला 6 वर्षं झाली. २०१७ साली विराट अनुष्काने इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडिओ आजही तितकेच फ्रेश वाटतात आणि व्हायरल होत असतात.
4 / 7
काल दोघांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस कुटुंब आणि मित्र परिवारासोबत साजरा केला. आज विराट आणि अनुष्काने इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या याच सेलिब्रेशन फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
5 / 7
अनुष्काने अॅनिव्हर्सीनिमित्त ब्लॅक जंपसूट घातला होता. यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तर विराट नेहमीप्रमाणेच आपल्या स्मार्ट लूकमध्ये दिसला. गडद निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स असा त्याचा पेहराव होता.
6 / 7
६ वर्ष ते infinity असं दोघांनी फोटोंना कॅप्शन दिलं. कलाकार मंडळी आणि चाहते विरुष्कावर प्रेमाची उधळण करत आहेत.या फोटोंमध्ये अनुष्काने तिचं बेबी बंप लपवलेले आहे. अनुष्का लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
7 / 7
सध्या त्यांच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.तसंच यातील एका फोटोत विराटचा मजेशीर अंदाजही बघायला मिळाला. केक कापताना विराटच्या हावभावाने लक्ष वेधून घेतलं. म्हणजे
टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीलग्नसोशल मीडिया