विवेक अग्निहोत्रीचे 'द कश्मीर फ़ाइल्स' आधीचे ७ सिनेमे, जे वेगळ्याच कारणाने आले होते चर्चेत.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 2:05 PM1 / 8Vivek Agnihotri Films: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द काश्मीर फाइल्स' सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचार आणि विस्थापनाची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली. या सिनेमाला भरभरून रिस्पॉन्सही मिळतो आहे आणि वादही पेटला आहे. कमी बजेटमधील या सिनेमाने आतापर्यंत २०० कोटी रूपयांची कमाई केली आहे. याआधीही विवेक अग्निहोत्रीच्या अनेक सिनेमांची चर्चा झाली. फक्त फरक इतका आहे की, हे सिनेमे फ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आले होते. चला जाणून घेऊ त्यांचे सिनेमे जे फ्लॉप झालेत. (Image Credit : business-standard.com)2 / 8जुनूनियत - हा सिनेमा २०१६ मध्ये आला होता. यात यामी गौतम आणि पुलकित सम्राट यांची जोडी होती. ही एक लव्ह स्टोरी होती. पण हा सिनेमा आला कधी आणि गेला कधी समजलंच नाही. हा सिनेमा इतका फ्लॉप झाला होता की, लोकांनी विवेक अग्निहोत्री यांना असा सिनेमा पुन्हा न बनवण्याचा सल्ला दिला होता.3 / 8द ताशकंद फ़ाइल्स - विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा रागिनी नावाच्या एका महिला पत्रकाराबाबत आहे. तिला माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या ताशकंदमधील रहस्यमय मृत्यूबाबत एका अज्ञात व्यक्तीकडून पुरावा मिळतो. या सिनेमा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. रिव्ह्यू चांगले मिळाले होते, पण बॉक्स ऑफिसवर सिनेमाने कमाल दाखवला नाही.4 / 8ज़िद - २०१४ मध्ये आलेल्या या सिनेमात मन्नारा, करणवीर शर्मा आणि श्रद्धा दास यांनी काम केलं होतं. विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या जॉनरपेक्षा वेगळा रोमॅंटिक सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केला होता. यात गुन्हेगारीचाही प्लॉट होता. यात लव्ह ट्रायंगल, गुप्तहेरी, काही साक्षीदार आणि वादळाच्या रात्री दाखवण्यात आल्या आहेत. यात बोल्डनेस जास्त होता. 5 / 8बुद्धा इन ए ट्रॅफ़िक जाम - यात अरूणोदय सिंहने मुख्य भूमिका केली होती. तो एक मॅनेजमेंट स्टुडंट आहे. त्याला वाटत असतं की, योग्य विचारधारा सर्वांना समान विश्व बनवण्यात मदत करू शकते. यात अनुपम खेर आणि माही गिलनेही काम केलं होतं. सिनेमा सिरिअस आहे. पण व्हॉल्यूम कमी होता. याला फार कमी रेटींग मिळालं होतं.6 / 8चॉकलेट- डीप डार्क सीक्रेट्स - या सिनेमात अनिल कपूर, अरशद वारसी, इरफ़ान ख़ान, इमरान हाशमी, सुनील शेट्टी, तनुश्री दत्तासहीत अनेक स्टार्स होते. २००५ मध्ये आलेला हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा 'The Usual Suspects' चा रिमेक होता. पण हा सिनेमा ओरिजनलपेक्षा फार वेगळा होता. 7 / 8 हेट स्टोरी - विवेक अग्निहोत्रीच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठीक ठाक कलेक्शन केलं होतं. यात एका महिलेच्या बदल्याची कहाणी होती. बोल्डनेस होताच त्यामुळे बरा रिस्पॉन्स मिळाला होता.8 / 8धन धना धन गोल - हा एक स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे. ज्यात जॉन अब्राहम, बिपाशा बसु, अरशद वारसी आणि बोमन ईरानी दिसला होता. यातून धर्माच्या नावावर भेदभावाचा मुद्दाही दाखवला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications