आमिरसारखे मी पण आणखी ढोंग नाही करू शकत...! वरिना हुसैनचा सोशल मीडियाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 17:38 IST
1 / 9काही दिवसांपूर्वी आमिर खानने सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. आता अभिनेत्री वरिना हुसैनने सोशल मीडियाला अलविदा म्हटले आहे.2 / 9गेल्या वर्षीही वरिनाने सोशल मीडियापासून महिनाभर ब्रेक घेतला होता. आता तिने चक्क सोशल मीडिया सोडत असल्याची घोषणा केली आहे.3 / 9वरिनाने एक पोस्ट शेअर करत आपल्या या निर्णयाची माहिती दिली. तिच्या या निर्णयाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.4 / 9 मला आठवतेय मी कुठेतरी वाचले होते की तुमच्या जाण्याची घोषणा इथे करू नका कारण हे काही विमानतळ नाही. पण मी इथेच माझ्या जाण्याची घोषणा करणार आहे माझ्या चाहत्यांसाठी आणि मित्रांसाठी ज्यांनी मला इतके प्रेम दिले, त्यांच्यासाठी ही घोषणा आहे. ही माझी शेवटची मीडिया पोस्ट आहे, यानंतर माझे अकाउंट सुरू राहील आणि माझी टीम माझ्या कामाबद्दल यावर पोस्ट करेल, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.5 / 9 आमिर सरांच्या भाषेत सांगायचे तर अजून ढोंग नाही करू शकत, असे म्हणत तिने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. 6 / 9तुम्हाला माहित आहेच की, वरिनाने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 7 / 9‘लवयात्री’ या सिनेमात ती आयुष शर्मा सोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या कामाचे चांगलेच कौतुक झाले होते.8 / 9यानंतर ‘दबंग ३’ मध्ये ती सलमान खानसोबत थिरकताना दिसली होती. 9 / 9सध्या ती ‘द इनकम्पलीट मॅन’ या चित्रपटात बिझी आहे. वरीना लवकरच साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. एका तेलगू सिनेमात ती झळकणार आहे़ यात तिच्यासोबत कल्याण राम मुख्य भूमिकेत आहे.