Join us

नववर्षांत धम्माल करणार हे सहा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:40 AM

नववर्षांच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. काही तासानंतर सर्वजण मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करतील. यंदा बॉलिवूडमध्येही नववर्षाचे धमाकेदार स्वागत होणार आहे.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये ज्या एका मोठ्या चित्रपटावर संपूर्ण इंडस्ट्रीच्या नजरा लागलेल्या आहेत, तो आहे ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’.

नववर्षांच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. काही तासानंतर सर्वजण मावळत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करतील. यंदा बॉलिवूडमध्येही नववर्षाचे धमाकेदार स्वागत होणार आहे. होय, या नववर्षांत काही धमाकेदार चित्रपट सिनेप्रेमींच्या भेटीस येणार आहे. शिवाय काही नवे चेहरेही मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. तेव्हा जाणून घेऊ यात, नववर्षांत येऊ घातलेल्या मोठ्या चित्रपटांबद्दल....

मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी

२०१९ मध्ये ज्या एका मोठ्या चित्रपटावर संपूर्ण इंडस्ट्रीच्या नजरा लागलेल्या आहेत, तो आहे ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये कंगना राणौतचा नवा अंदाज पाहायला मिळाला. कंगना राणौत या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका करताना दिसणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची सहदिग्दर्शिकाही आहे. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.   येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली.

केसरी

हा चित्रपट २१ मार्च २०१९ मध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करीत आहेत. १८९७ मध्ये ब्रिटिश भारतीय सेनेच्या एका छोट्याशा तुकडीत आणि अफगाण सेनेमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर (बॅटल आॅफ सारागढी) चित्रपटाची कथा आहे. या युद्धात केवळ २१ शीख जवान अफगाणच्या १० हजार सैनिकांना भारी पडले होते. 

भारत 

सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले आहे. एडिटिंग वर्कही सुरू झाले आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट फायनल झालेली नाही. लवकरच ती होईल, अशी शक्यता आहे. ‘भारत’चे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ व दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहेत.

कलंक

वरूण धवन, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित,आदित्य राय कपूर व सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट नववर्षांतील येऊ घातलेल्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. संजय दत्तही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरु आहे.

साहो

‘बाहुबली2’नंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय  जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 गली ब्वॉय

या चित्रपटातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. होय, सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. अन्य चित्रपट

या चित्रपटांशिवाय २०१९ मध्ये इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’, जबरिया जोडी, एक लडकी को देखा तो ऐसे लगा, टोटल धमाल असे अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीबॉलिवूड