बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत असलेली ही आहे, प्रेम चोप्रांची नात सांची भल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST
अभिनेता प्रेम चोप्रा यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका अजरामर केला. प्रेम चोप्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची नात सांची भल्ला ही सुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.
बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत असलेली ही आहे, प्रेम चोप्रांची नात सांची भल्ला!
अभिनेता प्रेम चोप्रा यांनी खलनायकाच्या अनेक भूमिका अजरामर केला. प्रेम चोप्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची नात सांची भल्ला ही सुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.प्रेम चोप्रा यांच्या तीन मुली आहेत. रकिता, पुनीता व प्रेरणा. पुनिताने सिंगर व अॅक्टर विकास भल्लासोबत लग्न केलेय.सांची ही याच दोघांची मुलगी आहे. सांची सनी देओलचा मुलगा करण देओलच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करू शकते, अशी चर्चा आहे. करणच्या या चित्रपटासाठी २०० मुलींचे आॅडिशन झाले होते. त्यातील सात मुली सिलेक्ट झाल्या आहेत. त्यात सांचीचे नाव सगळ्यांत वर असल्याचे कळते. ओबेराय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेली सांची इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव आहे. ती प्रचंड क्रिएटीव्ह आहे. तिला पेन्टिंगचा छंद आहे. तिच्या पेन्टिंग्सचे एग्जीबिशनही लागलेले आहे.