Join us

स्टारकिड्सच्या पार्टीत चालतं तरी काय, रात्री उशिरा काय होतं? पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 1:29 PM

1 / 8
मनोरंजन जगतातून स्टारकिड्सच्या लेटनाईट पार्टीच्या बातम्या येत असतात. एवढंच नाही. तर त्याचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा समोर येतात. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या पार्ट्यांमध्ये नेमकं असतं तरी काय, याचे काही खास फोटो.
2 / 8
स्टारकिड्सच्या पार्टीमध्ये नेहमी वेगळंच वातावरण असतं. काही दिवसांपूर्वी अजय देवगनची कन्या न्यासा देवगन हिचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून तिला ट्रोलही करण्यात आले होते.
3 / 8
या फोटोंमध्ये एकाच ठिकाणी तुम्हाला जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर ते अर्जुन कपूरची मुलगी महिका रामपालपर्यंत साऱ्याजणी दिसतील. स्टारकिड्सचा कॉमन मित्र औरी नेहमीच या पार्ट्यांमधील फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो.
4 / 8
या पार्ट्यांमध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसुद्धा सहभागी होतो. या फोटोंमध्ये सैफचा मुलगा पूजा बेदीची मुलगी आणि अभिनेत्री अलाया एफ हिच्यासोबत चिल करताना दिसत आहे.
5 / 8
संजय कपूरची मुलगी शनाया कपूरसुद्धा नेहमी पार्ट्यांमध्ये सहभागी होते. सुहाना खान आणि तिचा भाऊ आर्यन हेसुद्धा इतर स्टारकिड्सप्रमाणे या पार्ट्यांमध्ये स्पॉट होत असतात.
6 / 8
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हीसुद्धा स्टारकिड्सच्या पार्टीमध्ये जाण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही.
7 / 8
खुशी कपूरसुद्धा नेहमी आपल्या मित्रांसह मस्ती करताना दिसते. अनेकदा तिचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
8 / 8
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुलीला फार कमी लोक ओळखतात. मात्र तीसुद्धा मित्रांसोबत खूप एन्जॉय करते.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी