Join us  

अमिताभ बच्चन यांना सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची भीती वाटते? KBC 16 मध्ये बिग बींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 3:27 PM

1 / 7
अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जातात. अमिताभ सध्या KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. या मंचावर बिग बी त्यांच्या आयुष्यातले अनेक किस्से उलगडत असतात.
2 / 7
अमिताभ यांनी KBC 16 च्या मंचावर त्यांना कोणत्या गोष्टीची जास्त भीती वाटते याचा उलगडा केला. अमिताभ यांनी मनमोकळेपणाने समोरच्या स्पर्धकाशी बोलताना ही गोष्ट सांगितली.
3 / 7
बिग बी सर्वात जास्त झुरळाला घाबरतात असं ते म्हणाले. KBC 16 मध्ये प्रणिती पेदपती ही स्पर्धक सहभागी झाली होती. त्यांच्याशी बोलताना बिग बींनी झुरळाबद्दलची मनातली भीती सांगितली
4 / 7
अमिताभ यांनी याविषयी किस्सा सांगितला की, 'झुरळ कधीच मरत नाहीत. मी एकदा एका बॉटलमध्ये किटकनाशक टाकून मोठ्या प्रयासाने त्यात झुरळाला पकडलं.'
5 / 7
अमिताभ पुढे म्हणाले, 'झुरळाचा विषय इथेच थांबला नाही. मी सहा दिवसांनी ती बॉटल पुन्हा उघडून बघितली. बॉटल उघडताच ते झुरळ तिथून उडून गेलं.'
6 / 7
अमिताभ यांनी झुरळाविषयीचा हा किस्सा सांगताच KBC 16 चा मंच आणि प्रेक्षक खळखळून हसायला लागले. अमिताभ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मिश्किल अंदाजात सर्वांची मनं जिंकली.
7 / 7
KBC 16 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धक प्रणिती पेदपती यांनी २५ लाखाच्या प्रश्नावर खेळ सोडला. १२ लाख ५० हजार ही विजयी रक्कम घेऊन प्रणिती यांनी खेळातून माघार घेतली
टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चन