जयाप्रदा यांना चालत्या ट्रेनमध्ये करावी लागली होती आंघोळ, कारण डायरेक्टरला घालवायचा नव्हता सीन By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 2:10 PM1 / 10बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा डान्समध्ये तरबेज अभिनेत्रींचा जमाना होता. जया प्रदा, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, मीनाषी शेषाद्री यांच्यासारख्या अभिनेत्री क्लासिकल डान्ससाठी प्रसिद्ध होत्या. आंध्र प्रदेशची राहणारी जया प्रदाला तर तिच्या डान्समुळेच सिनेमात काम करण्याची ऑफर मिळाली होती. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा डान्समध्ये तरबेज अभिनेत्रींचा जमाना होता. जया प्रदा, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, मीनाषी शेषाद्री यांच्यासारख्या अभिनेत्री क्लासिकल डान्ससाठी प्रसिद्ध होत्या. आंध्र प्रदेशची राहणारी जया प्रदाला तर तिच्या डान्समुळेच सिनेमात काम करण्याची ऑफर मिळाली होती. 2 / 10जया यांना त्यांच्या आईने बालपणीच डान्सचं शिक्षण देण्यास सुरूवात केली होती. असं सांगितलं जातं की, जया शाळेत अॅन्युअल फंक्शनमध्ये डान्स करत होत्या. तेव्हा तिथे आलेल्या एका दिग्दर्शकाची नजर त्यांच्यावर पडली. त्यांना जया यांची सुंदरता आणि डान्स इतका आवडला की, त्यांनी जया यांना तेलुगू सिनेमा 'भूमि कोसम'मध्ये एक डान्स नंबर करण्याची ऑफर दिली. 3 / 10इथूनच जया यांचं फिल्मी करिअर सुरू झालं होतं. तेलुगू, तमिळ आणि कन्नड सिनेमांमध्ये काम केल्यावर जया यांच्या बॉलिवूड एन्ट्रीने धमाका झाला.4 / 10जयाप्रदा जेव्हा हिंदी सिनेमात काम करू लागल्या तेव्हा परवीन बाबी, राखी, झीनम अमान यांची जादू कमी होऊ लागली होती. १९७९ मध्ये निर्माता-दिग्दर्शक विश्वनाथ यांनी जया प्रदा यांना घेऊन 'सरगम' सिनेमा केला. हा सिनेमा हिट ठरला आणि जयाप्रदा रातोरात स्टार बनल्या. 5 / 10आपल्या सिनेमांसाठी जया मोठी मेहनत घेत होत्या. कोणत्याही गोष्टीसाठी त्या कंटाळा करत नव्हत्या. त्यावेळी आजच्यासारख्या सुविधा आणि टेक्नॉलॉजी नव्हती. त्यामुळे शूटींग लोकेशन आणि टायमिंगची फार काळजी घ्यावी लागत होती. 6 / 10अशात अभिनेत्रींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. जयाप्रदा यांनी तसे तर अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यातील एक होता 'डफलीवाले'. या सिनेमातील ऋषी कपूर आणि जया यांच्या 'डफलीवाले डफली बजा' या गाण्याने धुमाकूळ घातला होता.7 / 10याच सिनेमातील एक किस्सा आहे. हा किस्सा वाचल्यावर तेव्हा कलाकारांना कशा कशा स्थितीत काम करावं लागत होतं हे कळून येतं.8 / 10जयाप्रदा यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'एकदा मला चालत्या ट्रेनमध्येच आंघोळ करावी लागली होती. कारण आम्हाला लोकेशनवर पोहोचल्या पोहोचल्या शूटींग करायचं होतं. दिग्दर्शकाला सकाळच्या पहिल्या किरणात सीन शूट करायचा होता. मी चौवीस तास काम करत होते. मी स्वत:च माझं मेकअप करायचं शिकले होते. सिनेमाच्या डिमांडनुसार आम्हाला एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जावं लागत होतं. आम्ही कशा कशा स्थितीत शूटींग केलं. आज जेव्हा मी ऐकते की, व्हॅनिटी व्हॅन नसल्याने तरूणी सहकार्य करत नाही तेव्हा मी चक्रावून जाते'.9 / 10अभिनेत्री जयाप्रदा आपल्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांन तोहफा, औलाद, शराबी, मवाली सारख्या सुपरहिट सिनेमात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications