When mithun chakraborty son mahaakshay chakraborty face rape allegations before his marriage
मिथुन चक्रवर्तींचा मुलगा महाअक्षयवर अभिनेत्रीने केला होता बलात्काराचा आरोप, ठरलेले लग्न केले होते रद्द By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 01:23 PM2021-03-09T13:23:24+5:302021-03-09T19:09:05+5:30Join usJoin usNext अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सध्या ते बरेच चर्चेत आहेत. पण काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा महाअक्षय देखील चर्चेत आला होता. एवढेच नव्हे तर त्याचे लग्नही रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्याचे लग्न अभिनेत्री मदल्या शर्माशी झाले. महाअक्षयचे नाव मिमोह देखील असून त्याने चित्रपटसृष्टीत एंट्री करण्यासाठी त्याचे नाव बदलले. (Photo Instagram) तो काही महिन्यांपूर्वी एका वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आला होता. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास सक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. .(Photo Instagram) हिंदी आणि भोजपूरी चित्रपटातील एका अभिनेत्रीने हे आरोप केले होते. लग्नाचे आमिष दाखवून महाअक्षयने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा या अभिनेत्रीने केला होता.(Photo Instagram) यानंतर योगिता बालीने अभिनेत्रीला बोलावून धमकावले. योगित्या म्हणाल्या होत्या की, स्वप्नांमध्येसुद्धा ती त्यांची सून होऊ शकत नाही. जेव्हा अभिनेत्रीला मिमोहच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ती नैराश्यात गेली. Photo Instagram) महाअक्षय चक्रवर्ती याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यावेळी काहीच दिवसानंतर त्याचे लग्न होते. दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी मदालसा शर्मा यांचा विवाह होणार होता. (Photo Instagram) लग्नाला उणेपुरे पाच दिवस उरले असताना महाअक्षयवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या सगळ्यामुळे त्याच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण हे प्रकरण शांत झाल्यानंतर मदालसा आणि त्याने काहीच दिवसांत लग्न केले. (Photo Instagram) २००८मध्ये ‘जिम्मी’ या चित्रपटातून महाअक्षयने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर महाअक्षयचे आणखी चार चित्रपट आलेत. पण तेही आपटले. (Photo Instagram) मदालसा एक अभिनेत्री आहे. हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ, जर्मन, पंजाबी अशा अनेक भाषिक चित्रपटांत तिने काम केले आहे. मदालसा लहानपणापासूनच अभिनेत्री बनू इच्छित होती. याला कारणही होते. कारण मदालसाचे आई-वडील हे बॉलिवूड इंडस्ट्रीशी जुळलेले होते. (Photo Instagram) मदालसाच्या पित्याचे नाव सुभाष शर्मा आहे. सुभाष शर्मा एक नामवंत दिग्दर्शक आहेत. मदालसाची आई शीला शर्मा सुद्धा अभिनेत्री आहे . (Photo Instagram) ‘नदिया के पार’, ‘यस बॉस’, ‘घातक’, ‘हम साथ साथ है’ यासारख्या हिट चित्रपटात शीला शर्मा यांनी काम केले आहे. (Photo Instagram) १९९८ मध्ये आलेल्या बी आर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत शीला देवकीच्या भूमिकेत दिसल्या होत्या.(Photo Instagram) टॅग्स :मिथुन चक्रवर्तीMithun Chakraborty