Join us

श्रीदेवी आणि मोना कपूर एकेकाळी होत्या चांगल्या फ्रेंड्स, मोना यांना मैत्रीत मिळाला होता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 6:22 PM

1 / 6
बोनी कपूरची पहिली पत्नी मोना कपूरचे आजच्याच दिवशी कर्करोगाने निधन झाले.
2 / 6
मोना कपूर या एक प्रसिद्ध निर्मात्या आणि बिझनेस वुमन देखील होत्या. त्यांनी अनेक प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली होती.
3 / 6
मोना कपूर आणि बोनी कपूर यांचे 1983मध्ये लग्न झाले. त्यांना अर्जुन आणि अंशुला अशी दोन मुलं आहेत.
4 / 6
मोना कपूर यांच्या आयुष्यात सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांना अचानक बोनी कपूर आणि श्रीदेवी यांनी लग्न केले असल्याची बातमी कळली. या बातमीने त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या.
5 / 6
मोना कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे बोनी यांच्यासोबत अरेंज्ड मॅरेज झाले होते. लग्नाच्यावेळी मी केवळ 19 वर्षांचे होते तर बोनी माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे होते.
6 / 6
श्रीदेवी आणि मोना कपूर या एकेकाळी खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या. याविषयी मोना कपूर यांनी सांगितले होते की, बोनीला माझी नव्हे तर दुसऱ्या कोणाची तरी आयुष्यात गरज होती आणि ती गरोदर असल्याने आमच्या नात्याला दुसरी संधी देण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी या नात्यातून बाहेर पडली. या लग्नामुळे मलाच नव्हे तर माझ्या मुलांना देखील धक्का बसला होता. त्यामुळे कधीच अर्जुन तिला त्याच्या आईचा दर्जा देऊ शकला नाही.
टॅग्स :श्रीदेवीबोनी कपूर