Join us

Uorfi Javed : लोक उर्फी जावेदच्या गरिबीची खिल्ली उडवायचे तेव्हा 'या' अभिनेत्रीने केली मदत; दिली खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 5:51 PM

1 / 12
उर्फी जावेद सोशल मीडियावरची सर्वात लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे. तिच्या आउटफिटमुळे ती अनेकदा ट्रोल होते. पण तिला त्याची पर्वा नाही. आज ती तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्सने इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. यासोबतच ती जाहिरातीतून चांगली कमाई करते.
2 / 12
उर्फीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. उर्फीचे वडील तिच्या विरोधात होते. ती घरातून पळून मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण फार काही झालं नाही.
3 / 12
या काळात अनेकांनी उर्फीच्या गरिबीची आणि बेरोजगारीची खिल्ली उडवली. आपल्या कपड्यांच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम ती नेहमीच करत असते. मात्र तिची परिस्थिती जेव्हा अत्यंत वाईट होती तेव्हा एका भोजपुरी अभिनेत्रीने तिला मदत केली.
4 / 12
संभावना सेठच्या व्लॉगमध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील या कटू अनुभवाचं सत्य सर्वांना सांगितलं आहे. ती म्हणाली, 'माझं एका व्यक्तीशी भांडण झालं होतं. त्या माणसाने माझ्यावर खूप घाणेरडी कमेंट केली होती.'
5 / 12
'तो माझ्याशी घाणेरडा बोलत होता. हिच्याकडे पैसे नाहीत. हिच्याकडे कपडे नाहीत आणि वेळही नाही. ऑटो-टॅक्सीतून फिरते असं देखील त्याने मला म्हटलं'
6 / 12
उर्फी जावेद पुढे म्हणाली, 'त्याने माझा खूप अपमानही केला. त्यानंतर संभावनाने मला मदत केली. संभावना म्हणाली, तू ऑटोने प्रवास करतेस का? माझी कार घे. ही कार संभावनाच्या हृदयाच्या अगदी जवळ होती.'
7 / 12
उर्फी जावेदने संभावना सेठचे मनापासून आभार मानले आहेत. अभिनेत्रीने सांगितलं की, 15 दिवसांनी तिने एक कार घेतली आहे. आता उर्फीने आणखी एक जीप घेतली आहे.
8 / 12
संभावना सेठनेही आनंद व्यक्त केला आणि उर्फीला तिची छोटी बहीण म्हटलं आहे. उर्फीला कोणीही ओळखत नव्हतं, तेव्हापासून ती तिला ओळखत होती, असंही तिने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 12
काही लोक उर्फी आजच्या तरुणाईला बिघडवत असल्याचं देखील म्हणतात. पण यामुळे उर्फीला काही फरक पडत नाही. अशाच एका मुलाखतीत उर्फीला जेव्हा प्रेमाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.
10 / 12
एक काळ असा होता जेव्हा ती खूप रोमँटिक होती. ती खूप लवकर सर्वांच्याच प्रेमात पडायची, पण आता ती परिस्थिती बदलली आहे. उर्फीला आता प्रेमात अजिबात रस नाही कारण आता तिच्याकडे पैसे आहेत. आधी तिच्याकडे भरपूर मोकळा वेळ होता, पण आता खूप काम आहे. उर्फीची ही गोष्ट लोकांना अजिबात आवडलेली नाही.
11 / 12
लोक म्हणतात की, उर्फीसाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. पैशांसाठी ती काहीही करू शकते. उर्फीने आपल्य़ा इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात. तसेच ती आपलं मत देखील बिनधास्तपणे मांडते.
12 / 12
टॅग्स :उर्फी जावेदबॉलिवूड