सतत बोल्ड भूमिकाच ऑफर व्हायच्या म्हणून ‘या’ अभिनेत्रीनं सोडलं बॉलिवूड By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 4:13 PM1 / 11 करियरच्या सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या. 2 / 11रियाला सेक्सी भूमिकांचा वीट आला होता.त्यामुळेच अशा भूमिका मला नको असंच जाहीर करुन टाकलं. 3 / 11सेक्सी या शब्दाचा अर्थच नेमका काय हे आजवर कुणालाच कळला नाही असं रियाने म्हटले होते.4 / 11हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं की आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं. मात्र या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत.5 / 11सेक्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनालिटी.आपल्याला कुणीही सेक्सी म्हटलं तर आवडेल. 6 / 11तरीही बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाने स्पष्ट केले होते. 7 / 11त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या.8 / 11त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं. केवळ लोकांना सेक्सी आवडतं म्हणून कमी कपड्यात मला दाखवणं असं त्यांनी काही केलं नाही. 9 / 11ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होतो आणि फारशी जाण नव्हती. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती.10 / 11काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे. 11 / 11आगामी काळात काही तरी वेगळेपण, नाविन्य असलेल्या भूमिका ऑफर झाल्या तरच स्विकारणार असल्याचे तिने म्हटले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications