Lata Mangeshkar Death Anniversary: “पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको...”, असं का बोललेल्या लता दीदी...? By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 12:29 PM1 / 12आपल्या सुमधुर गायनाने केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे गायिका लता मंगेशकर. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी लतादीदी हे जग सोडून गेल्या.2 / 12आज लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड गेल्या. दीदी आज आपल्यात नाहीत पण त्यांचे स्वर आणि गाणी आपल्या मनात कायम राहतील.3 / 12लता मंगेशकर यांच्यासारखा दैवी स्वर घेऊन जन्माला येण्याचं भाग्य कोण नाकारेल? पण लता दीदींना मात्र पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्मास यायला नको होतं.4 / 12'मला पुढच्या आयुष्यात लता मंगेशकर व्हायचे नाही...,' हे त्यांचेच शब्द. एका मुलाखतीत त्या स्वत: असं म्हणाल्या होत्या. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं होतं.5 / 12जावेद अख्तर यांनी एकदा लता मंगेशकर यांची मुलाखत घेतली होती. पुढच्या जन्मात तुम्ही काय बनू इच्छिता? असा प्रश्न जावेद अख्तर यांनी दीदींना विचारला होता.6 / 12या प्रश्नावर लता दीदींनी हसत हसत उत्तर दिलं होतं. मला याआधीही हा प्रश्न विचारला गेला आहे. मी तेव्हा जे उत्तर दिलं तेच आत्ता देईल, असं त्या म्हणाल्या होत्या.7 / 12'पुढचा जन्म मिळाला नाही तर चांगलंच. पुन्हा जन्म मिळाला तर काहीही व्हायला आवडेल पण फक्त लता मंगेशकर म्हणून पुन्हा जन्माला यायचं नाही...', असं त्या म्हणाल्या होत्या.8 / 12असं का? असं विचारल्यावर,' लता मंगेशकर की जो तकलीफें हैं, वो बस लता ही जानती है, ' असं त्या म्हणाल्या होत्या. लता दीदींच्या निधनानंतर त्यांच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती.9 / 12लता दीदीनी खूप नाव लौकिक मिळवला. पण या प्रवासात त्यांच्या वाट्याला मोठा संघर्ष आला. वडिलांच्या अकाली निधन झाल्यानंतर आई व चार लहान भावंडांची जबाबदारी दीदींच्या खांद्यावर आली.10 / 12दीदींचं बालपण फारच खडतर अवस्थेत गेलं होतं. कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्यांना खूप लहान वयात काम सुरू करावं लागलं.11 / 12संघर्षाच्या काळात त्या काळात लता मंगेशकर यांना मुंबईत स्टुडिओंमधून पायपीट करावी लागे. प्रवास करण्याएवढेही कधी पैसे नसायचे, तेव्हा चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.12 / 121945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली आणखी वाचा Subscribe to Notifications