90's चा काळ गाजवणारी गुड्डी मारुती आठवते का? जाणून घ्या, सध्या कुठे आहे अन् काय करते ती By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 8:00 AM1 / 890 च्या काळात आपल्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी गुड्डी मारुती (Guddi Maruti) आठवते का? या अभिनेत्रीने त्याकाळी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं.2 / 8आपल्या विनोदी अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या गुड्डी मारुतीचा जन्म ४ एप्रिल १९६१ मध्ये मुंबईमध्येच झाला. तिचं खरं नाव ताहिरा परब. पण, गुड्डी या टोपणनावानेच ती लोकप्रिय झाली.3 / 8ताहिरा यांच्या वडिलांचं नाव मारुतीराव होतं. त्यामुळे त्यांनी कलाविश्वात येताना परब आडनाव लावण्यापेक्षा मारुती हेच नाव लावायला सुरुवात केली. तेव्हापासून ताहिरा परबची गुड्डी मारुती झाली.4 / 8वयाच्या १० व्या वर्षी जान हाजिर या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या गुड्डी मारुतीने असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, सध्या गुड्डी काय करते, कशी दिसते असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.5 / 8८० ते ९० च्या काळात गुड्डी मारुतीने 'आग और शोला', 'नगीना', 'शपथ', 'दीवाना मस्ताना', 'बंदिश', 'मुकदमा', 'दिल तेरा आशिक', 'आशिक आवारा', 'शोला और शबनम', 'चमत्कार', 'खिलाड़ी', 'फरिश्ते', 'बलवान', 'चोर मचाये शोर', शिकार, 'बड़े दिलवाला, 'वक़्त हमारा है', 'तराजब', 'राजाजी', 'दूल्हे राजा', 'बीवी नंबर 1' और 'दिल ने फिर याद किया' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.6 / 8परंतु, २००६ मध्ये त्यांनी कलाविश्वातून ब्रेक घेतला. पण,२०१५ मध्ये त्या नव्या जोमाने पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाल्या. 7 / 8सध्या ती छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत आहे. 'मिसेस कौशिक की पांच बहुएं', 'डोली अरमानों की', 'ये उन दिनों की बात है' 'हेल्लो ज़िंदगी' या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.8 / 8विशेष म्हणजे गुड्डी मारुतीच्या लूकमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. आता त्या Fat to Fit चं परफेक्ट उदाहरण झाल्याचं म्हटलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications