कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 6:21 PM1 / 13अनेक अभिनेत्री कलाविश्वात आल्या आणि रातोरात स्टारडम मिळाल्यानंतर त्यांनी अभिनय सोडून इंडस्ट्रीपासून दूर गेल्या. या यादीत किमी काटकर यांच्या नावाचाही समावेश आहे. 2 / 13सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक असलेल्या किमी यांच्या सौंदर्याची तुलनाच नव्हती. हलके निळे डोळे, मनावर अधिराज्य गाजवणारे स्मित आणि सुंदर वैशिष्ट्ये... लोक त्यांच्या अदांवर फिदा व्हायचे.3 / 13किमी काटकर यांचे खरे नाव नयनतारा होते. चित्रपटात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे नाव बदलून किमी ठेवले. त्यांची आई टीना काटकर यांनीही चित्रपटांमध्ये काम केले आहे. 4 / 13आपल्या आईप्रमाणेच किमी यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि प्रसिद्ध झाल्या. 'पत्थर दिल' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.5 / 13'ॲडव्हेंचर ऑफ टारझन'ने किमी काटकर यांचे नशीब उजळले. हेमंत बिर्जे स्टारर चित्रपटात अभिनेत्री एवढ्या बोल्ड अवतारात दिसली होती की सगळेच अवाक् झाले होते. या सीनवरून बराच गदारोळ झाला होता. 6 / 13वास्तविक, चित्रपटात एक न्यूड सीन होता जो चुकून शूट करण्यात आला होता आणि निर्मात्यांना ते काढून टाकण्यास सांगितले होते, परंतु ते काढले गेले नाही.7 / 13या चित्रपटानंतर किमी सिनेविश्वात रातोरात स्टार बनल्या. त्यांच्या जवळ चित्रपटांची रांग लागली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचे अवघ्या एका वर्षात १५ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांनी 'मेरा लहू', 'दरिया दिल', 'सोने पर सुहागा', 'गैर लीगल' आणि 'जैसी करनी वैसे भरनी' असे अनेक चित्रपट केले. पण 'टारझन'सारखं यश मिळालं नाही.8 / 13त्यानंतर १९९१ मध्ये किमी काटकर यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटापेक्षा 'जुम्मा-चुम्मा दे दे' हे गाणे जास्त गाजले. या गाण्याने किमी यांना उरलेले यशही दिले. 9 / 13हिट करिअर असूनही, किमी काटकर यांनी १९९२ मध्ये 'हमला'च्या शूटिंगनंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. IMDbनुसार, १९९२ मध्ये किमी काटकर यांनी प्रोफेशनल फोटोग्राफर आणि प्रोड्युसर शंतनू शौरीशी लग्न केले आणि सर्व काही सोडून मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाल्या. त्यांना सिद्धांत नावाचा मुलगाही आहे. 10 / 13एकदा हेराल्ड गोवाला दिलेल्या मुलाखतीत किमी यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचे कारण सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मला वाटते की मी योग्य वेळी काम सोडले. हममध्ये अमित (अमिताभ) सोबत काम केल्यानंतर मी आणखी काय करू शकत होते? मी वयाच्या १७ व्या वर्षापासून मॉडेलिंग करत होते. १०-११ वर्षे सतत काम केल्यावर मला वाटले की मी सेटल व्हावे.11 / 13'हमला'च्या शूटिंगदरम्यान किमी यांनी सिनेइंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. या काळात त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या, पण त्यांनी त्या सर्व नाकारल्या. 12 / 13यश चोप्रांचीही ऑफर आली होती. त्यांना त्यांच्या 'परंपरा' चित्रपटात अभिनेत्रीला कास्ट करायचे होते, पण अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला. त्यांनी 'किंग अंकल'ही नाकारला होता.13 / 13सध्या किमी फिल्मी दुनियेतून पूर्णपणे गायब आहेत. त्या आता आपल्या कुटुंबासह गोव्यात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications