Aadar Jain-Alekha Advani: कोण आहे कपूर कुटुंबाची होणारी सून?, 'बेस्ट फ्रेंड'च्या बॉयफ्रेंडशीच करतेय लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 2:11 PM1 / 7कपूर कुटुंबात सध्या लग्नसराई आहे. आदर जैन (Aadar Jain) गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीसोबत (Alekha Advani) लग्नबंधनात अडकणार आहे. कालच त्यांचा रोका पार पडला. यावेळी अख्खं कपूर कुटुंब हजर होतं.2 / 7आदर जैन हा रीमा आणि मनोज जैन यांचा मुलगा आणि राज कपूर यांचा नातू आहे. यापूर्वी आदर काही वर्ष अभिनेत्री तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघंही फॅमिली फंक्शन्समध्ये, पार्टीजमध्ये सोबत दिसायचे. मात्र मधल्या काळात त्यांचा ब्रेकअप झाला. काही महिन्यांनी आदरने अलेखासोबतचं नातं जाहीर केलं. विशेष म्हणजे अलेखा ही तारा सुतारियाची बेस्ट फ्रेंड होती.3 / 7आदर जैनने आठ महिन्यांपूर्वी समुद्रकिनारी अलेखाला प्रपोज केलं. त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. तसंच तो तिला आपली पहिली क्रश असंही म्हणाला. अलेखा अडवाणी नक्की आहे तरी कोण?4 / 7अलेखा अडवाणी यशस्वी उद्योजिका आहे. तिने कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या हॉटेल स्कूलमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. लॉस एंजिलिस येथील एका MNC मध्ये काम करुन तिने करिअरला सुरुवात केली. 5 / 7यानंतर अलेखा भारतात परतली. तिने जुहू येथे कामाला सुरुवात केली. २०२० मध्ये अलेखाने अनेक सेमिनार आणि रिट्रीटद्वारे आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'वे वेल' ची स्थापना केली. कॉर्पोरेट नोकरी सोडून तिने सगळा वेळ यासाठी दिला.6 / 7अलेखा आणि तारा सुतारिया यादरम्यानच मैत्रिणी होत्या. तेव्हा तारा आणि आदर रोमँटिक रिलेशनशिपमध्ये होते. तीन वर्ष त्यांचं नातं होतं. अलेखाही बरेचदा त्यांच्यासोबत दिसायची. तिने स्वत:ला त्यांच्या रिलेशनशिपमधलं तिसरं चाक असंही म्हटलं होतं.7 / 7तीच अलेखा आता आदरची जीवनसाथी बनणार आहे. लोक अलेखालाच तारा आणि आदरच्या ब्रेकअपचं कारण मानतात. दुसरीकडे ताराने काल 'कर्मा इज अ बीच' अशी क्रिप्टीक पोस्टही शेअर केली जे एका पुस्तकाचं नाव आहे. मात्र तिचा रोख आदर आणि अलेखाच्या रोका सेरेमनीवरच होता अशी चर्चा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications