Join us

कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 9:56 AM

1 / 12
अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.
2 / 12
यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
3 / 12
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. सलमान खानने सिद्दिकी यांच्या हत्येबाबत समजताच बिग बॉसचं शूटिंग रद्द करत लगेचच रुग्णालयात धाव घेतली.
4 / 12
बाबा सिद्दिकी यांचे बॉलिवूड सेलिब्रिटींशी जवळचे संबंध होते. वांद्रे परिसरात त्यांचं कामकाज असल्याने आणि याच भागात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी राहत असल्याने त्यांचं बॉलिवूड कनेक्शन पाहायला मिळायचं.
5 / 12
त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावायचे. बाबा सिद्दिकींची इफ्तार पार्टी हा चर्चेचा विषय होता.
6 / 12
बाबा सिद्दिकींनी या इफ्तार पार्टीतच शाहरुख आणि सलमान खानमधील वाद मिटवत त्यांची गळाभेट घालून दिली होती.
7 / 12
२००८ साली शाहरुख आणि सलमानमध्ये कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीदरम्यान मतभेद झाले होते. त्यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर सलमान आणि शाहरुख फारसे एकत्रही दिसले नाहीत.
8 / 12
बाबा सिद्दिकी यांनी पुढाकार घेऊन सलमान आणि शाहरुखमधील हा वाद मिटवला होता. २०१३ साली बाबा सिद्दिकींनी त्यांच्या इफ्तार पार्टीला या दोघांनाही आमंत्रित केलं होतं.
9 / 12
या इफ्तार पार्टीतच बाबा सिद्दिकींनी सलमान-शाहरुखला एकत्र आणत त्यांच्यातील वाद मिटवले.
10 / 12
बाबा सिद्दिकी यांनी १९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. नगरसेवक ते राज्यमंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे.
11 / 12
१९९९, २००४ आणि २००९ असे तीन वेळा ते वांद्रे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले होते. २००४ साली ते राज्यमंत्रीही होते.
12 / 12
अलिकडेच बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकीदेखील राजकारणात सक्रिय आहे.
टॅग्स :बाबा सिद्दिकीसलमान खानशाहरुख खानराष्ट्रवादी काँग्रेस