जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडचं आहे शिंदे घराण्याशी कनेक्शन; वयाच्या २६व्या वर्षीच नावावर केलीये 'इतकी' संपत्ती By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 5:00 PM1 / 10बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जान्हवीला तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं होतं. 2 / 10गेल्या कित्येक वर्षांपासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत. कॉफी विथ करणमध्येही जान्हवीने शिखरबाबत भाष्य करत त्याला फॅमिली मॅन म्हटलं होतं. 3 / 10जान्हवी आणि शिखर एकत्र महाकालाच्या दर्शनालाही गेले होते. त्यानंतर आंध्र प्रदेशातील तिरुमलामधील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातही त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं. 4 / 10शिखरचा एका पार्टीतील सारा तेंडुलकरबरोबरचा फोटोही व्हायरल झाला होता. पार्टीसाठी शिखर आणि सारा एकाच गाडीतून जात असताना त्यांना स्पॉट करण्यात आलं होतं. 5 / 10शिखर पहाडिया हा एक पोलो प्लेयर आहे. २०१३मध्ये त्याने रॉयल जयपूर पोलो स्क्वॅडमधून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. पोलो प्लेयरबरोबरच शिखर एक घोडेस्वारही आहे. 6 / 10१३ वर्षांचा असल्यापासून शिखरने व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्याने वाधवान ग्लोबल कॅपिटल लंडन या कंपनीतही काम केलं आहे. 7 / 10शिखर पहाडियाचं काँग्रेसमधील शिंदेच्या घराशी कनेक्शन आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. 8 / 10सुशीलकुमार शिंदे यांची लेक स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे. 9 / 10शिखरची आई स्मृती शिंदे यादेखील मनोरंजनविश्वात कार्यरत आहेत. त्या एक निर्मात्याही आहेत. 10 / 10अवघ्या २६ वर्षाचा शिखर १० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ८४ कोटींचा मालक आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरही ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications