Join us

कोण आहे अभिनेत्री पायल मुखर्जी? कारवर बंगालमध्ये झाला हल्ला, रडत केला होता व्हिडीओ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 4:52 PM

1 / 9
Payel Mukherjee car attack in West Bengal: कोलकाता महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. संपूर्ण देशात या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. याचदरम्यान आज बंगाली अभिनेत्री पायल मुखर्जीवर हल्ला झाला. एका दुचाकीस्वाराने तिच्या कारवर हल्ला केला.
2 / 9
अभिनेत्री पायलने स्वतः याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा बंगालमधील महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. यादरम्यान, जिच्यावर हल्ला झाला ती पायल मुखर्जी कोण? हे जाणून घेऊया.
3 / 9
पायल मुखर्जी कोलकाताच्या साउथ एव्हेन्यूमधून जात होती, तेवढ्यात एक बाईकने कारला धडक दिली आणि मग त्याने कारची काच खाली करुन तिच्यावर पावडर ओतून हल्ला केला. पायल मुखर्जी फेसबुक लाईव्हमध्ये रडताना दिसली.
4 / 9
पायल ही बंगाली, साऊथ चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. ती बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. अभिनेत्री २०१७पासून फिल्म इंडस्ट्रीत अभिनय करत आहे. द सीवेज ऑफ रॉबिनहूड, कॅमेलियन टू श्रीरंगापुरम अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
5 / 9
'वो तीन दिन' या हिंदी चित्रपटात तिने संजय मिश्रा यांच्यासोबत काम केले आहे. पायल मुखर्जीच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये अंतर युद्ध, इन सर्च ऑफ सनशाइन, नॉन स्टॉप धमाल आणि पुल्लू या चित्रपटांचा समावेश आहे. नॉन स्टॉप धमालमध्ये ती राजपाल यादवसोबत दिसणार आहे.
6 / 9
पायल मुखर्जी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्यांचे २.२ लाख फॉलोअर्स आहेत. अलीकडेच ती अल्तमश फरीदीच्या गाण्यात ग्लॅमरस अंदाजात दिसली होती. हे गाणे जुलैमध्ये रिलीज झाले होते. त्याच्यासोबत गुलतेशाम दिसला.
7 / 9
अलीकडेच पायल मुखर्जीनेही कोलकाता बलात्कार प्रकरणावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. कोर्टाच्या सुनावणीचा व्हिडिओ शेअर करताना तिने तिचे रोखठोक मत मांडले होते.
8 / 9
तिने लिहिले होते की, मृत व्यक्तीचे फोटो सोशल मीडियावर दररोज शेअर केले जात आहेत. देशाचे नागरिक असूनही आपण अशा चुकीच्या गोष्टी करतो, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
9 / 9
दरम्यान, आजच्या हल्ल्याच्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारवाई करत दुचाकीस्वाराला रंगेहाथ पकडले. (सर्व फोटो सौजन्य- payelmukherjeeinsta)
टॅग्स :पश्चिम बंगालराजपाल यादवगुन्हेगारीकार