Join us

in Pics: एक्स्ट्रा पॉकेटमनीसाठी चित्रपटांत आली होती रकुलप्रीत सिंह, ट्रेनिंग जिममधून करते बम्पर कमाई

By रूपाली मुधोळकर | Published: September 25, 2020 6:09 PM

1 / 13
ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आज अखेर एनसीबीपुढे हजर झाली. आधी समन्स मिळालाच नाही, असा कांगावा तिने केला. पण मग एनसीबीने फटकारल्यानंतर चौकशीसाठी हजर झाली़ ही रकुल कोण, हे आज आम्ही सांगणार आहोत.
2 / 13
मी ड्रग्ज घेत नाही. ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा तिने यावेळी केला. अर्थात 2018 मध्ये रियासोबत ड्रग्जविषयी बोलले होते, अशी कबुली मात्र तिने दिली. अर्थात ही कबुली देताना सगळे खापर रियाच्या डोक्यावर फोडले. रिया चॅटच्या माध्यमातून तिचे सामान (ड्रग्ज) मागवत होती. तिचे सामान माझ्या घरी होते, असा जबाब तिने नोंदवला.
3 / 13
रकुलचा जन्म 12 ऑक्टोबर1990 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. रियाचे वडील लष्करात अधिकारी होते.
4 / 13
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रकुलने दिल्ली विद्यापीठाच्या जीसस अ‍ॅण्ड मेरी कॉलेजातून गणितात पदवी घेतली.
5 / 13
कॉलेजमध्ये असतानाच रकुलने मॉडेलिंग सुरू केले. 2009 मध्ये कन्नड सिनेमा ‘गिल्ली’ पासून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
6 / 13
खरे तर केवळ एक्स्ट्रा पॉकेट मनीसाठी रकुलने चित्रपटांत काम सुरु केले होते. साऊथच्या सिनेमातून इतके पैसे मिळतात, हेच तिला आधी ठाऊक नव्हते. खुद्द तिने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
7 / 13
विकिपीडीयानुसार, रकुल एक गोल्फ खेळाडू आहे. राष्ट्रीय स्तरावर ती खेळली आहे.
8 / 13
‘गिल्ली’ हा रकुलचा पहिलाच सिनेमा हिट झाला. पण यानंतर रकुलने पुन्हा शिक्षण पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. अगदी मॉडेलिंगही पुन्हा सुरु केले.
9 / 13
2011 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. काही दिवस मॉडेलिंग केल्यानंतर रकुल पुन्हा चित्रपटांकडे वळली.
10 / 13
2011 साली सिद्धार्थ राजकुमारसोबत ‘केरातम’ नावाच्या तेलगू सिनेमात तिला संधी मिळाली. यानंतर आणखी दोन तामिळ सिनेमेही केलेत. पण हे सिनेमे तिला फार ओळख देऊ शकले नाहीत. 2013 साली ‘वेंकटाद्री एक्सपे्रस’ या सिनेमाने मात्र तिचे नशीब पालटले. ती टॉलिवूडची महागडी अभिनेत्री बनली. मग तिला बॉलिवूड खुणावू लागले.
11 / 13
‘यारियां’ हा बॉलिवूडचा तिचा पहिला सिनेमा. 2018 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘अय्यारी’मध्ये झळकली आणि पाठोपाठ अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे’ हा सिनेमा तिला मिळाला. ‘दे दे प्यार दे’ हा तिचा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमाने रकुलला बॉलिवूडमध्ये नाव दिले, पैसा दिला, ग्लॅमर दिले.
12 / 13
फिटनेसबाबतीत ती अतिशय जागृत आहेत. अगदी एकही दिवस ती वर्कआऊट मिस करत नाही.
13 / 13
चित्रपटांशिवाय रकुल प्रीत सिंग तीन ट्रेनिंग जीमच्या फ्रेंन्चाइजी चालवते. हा तिच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे.
टॅग्स :रकुल प्रीत सिंग