Join us

Who was Singer KK: ना स्टारडमची हवा, ना कोणतंही व्यसन अन् बालपणीच्या प्रेयसीसोबत लग्न, 'सिंपल मॅन' केकेची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 9:50 AM

1 / 10
बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्ण कुमार कुन्नथ याचं कोलकात्यात काल रात्री एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला. केके यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप डॉक्टरांनी अधिकृतरित्या जाहीर केलेलं नसून प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
2 / 10
केके यांचं आयुष्य अगदी एका सामान्य व्यक्तीप्रमाणं होतं. स्टारडम किंवा ग्लॅमरची हवा त्याच्या डोक्यात कधी गेली नाही. त्यानं आपल्या आयुष्यात कधी मद्य किंवा सिगारेटलाही स्पर्श केला नाही. इतकंच काय तर बॉलीवूड विश्वात इतकी दमदार गाणी देऊनही तो ग्लॅमरपासून नेहमी दूर राहात आला होता.
3 / 10
२३ ऑगस्ट १९६८ रोजी जन्मलेल्या केके याचं बालपण दिल्लीत गेलं. दिल्लीच्या माऊंट सेंट मेरी स्कूल आणि किरोडी मल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे या शिक्षणानंतर त्यांनी सहा महिने एका कंपनीत मार्केटिंग एग्जिक्यूटिव्ह म्हणूनही काम केलं. त्यानंतर १९९४ साली ते मुंबईत आले. बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी केके यांनी तब्बल ३,५०० जिंगल्स केली आहेत.
4 / 10
Lesle Lewis यांना केके आपलं गुरू मानत असत. पार्श्वगायक म्हणून संगीतकार एआर रेहमान यांनी केके यांना संधी दिली आणि Kalluri Saaley व Hello Dr या गाण्यांमधून त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पहिल्यांदा पोहोचला.
5 / 10
संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप' गाण्यातून केके यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. याआधी त्यांनी 'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम वो गल्लियाँ' या गाण्यात छोटासा भाग गायला होता.
6 / 10
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच केके यांनी लग्न केलं होतं. त्यांनी १९९१ मध्ये आपली बालपणीची मैत्रीण ज्योती यांच्याशी लग्न केलं. त्यांचा मुलगा नकुल कृष्ण कुन्नत हा देखील गायक आहे. नकुलनं केके यांच्यासोबत त्यांच्या 'हमसफर' अल्बममध्ये गाणं गायलं आहे. केके यांना तमारा नावाची एक मुलगी देखील आहे.
7 / 10
१९९९ साली केके यांनी त्यांचा पहिला वहिला 'पल' नावाचा म्युझिक अल्बम रिलीज केला होता. यातील 'पल' आणि 'यारों दोस्ती' ही गाणी आजही हिट आहेत. दोन दशकांहून अधिक काळ संगीत विश्वात एकापेक्षा एक गाणी केके यांनी दिली आहेत.
8 / 10
तू आशिकी है (२००३), दस बहाने (२००५), तूही मेरी शब है (२००६), आखों में तेरी (२००७), खुदा जानें (२००८), दिल इबादत (२००९), पिया आये ना (२०१३) आणि तुने मारी एन्ट्री (२०१४) अशा एकापेक्षा एक हिट गाण्यांचं केके यांचं कलेक्शन आहे.
9 / 10
केके यांनी केवळ चित्रपटच नव्हे, तर टेलिव्हिजन मालिकांच्या टायटल साँगलाही आपला आवाज दिला आहे. हिप हिप हरी, शाका लाका बुम बुम आणि काव्यांजली या मालिकांची शिषर्कगीतं केके यांनी गायली आहेत.
10 / 10
केके यांनी बॉलीवूडमध्ये जवळपास सर्वच दिग्गज संगीतकारांसोबत काम केलं आहे. रोमँटिक गाण्यांसाठी संगीतकारांची केके यांच्या आवाजाला पहिली पसंती असायची. २००३ साली केके यांनी एमटीव्ही कोक स्टुडिओमध्ये आपल्याच 'तू आशिकी है' गाण्याचं नवं व्हर्जन सादर केलं होतं. त्यासही तुफान पसंती मिळाली होती.
टॅग्स :बॉलिवूड