Join us

अनेक वर्षांपासून ‘या’ असाध्य आजाराशी लढतेय यामी गौतम, इतक्या वर्षानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 12:11 PM

1 / 10
अभिनेत्री यामी गौतम म्हणजे बॉलिवूडची ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ गर्ल. तिच्या सौंदर्याचे चाहते कमी नाहीत. पाहणारा तिच्या गोड चेहºयावर आणि तितक्याच गोड हास्यावर चाहते फिदा होतात.
2 / 10
पण हीच यामी एका असाध्य त्वचा आजाराशी गेल्या अनेक वर्षांपासून लढतेय. होय, या आजारावर काहीही उपचार नाहीत.
3 / 10
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खुद्द यामीनं ही माहिती दिली आहे. मला एक त्वचा रोग आहे आणि त्यावर कोणताही इलाज नाही असे यामीने म्हटलं आहे.
4 / 10
यामीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये यामीने काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत यामीने तिच्या त्वचारोगाविषयी सांगितलं.
5 / 10
मला केराटोसिस पिलारिस हा त्वचा रोग आहे. यात त्वचेवर छोटे छोटे पुरळं येतात. मी मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं आणि मेकअपच्या मदतीने चेहºयावरची पुरळं लपवली जाऊ लागली. पण आता मी हे लपवणार नाही, असं तिनं पोस्टमध्ये म्हटले आहे.
6 / 10
आता मी हा आजार स्वीकारायचं ठरवलंय. मी अनेकवर्षांपासून हा आजार सहन करतेय. आधी मी लपवायचं. पण आता माझ्यातील काही त्रुटी मी प्रामाणिकपणे शेअर करतेय, असंही तिनं म्हटलं आहे.
7 / 10
यामी गौतम बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत ती झळकली आहे.
8 / 10
उरी, काबील, सनम रे, गिन्नी वेड्स सनी, विकी डोनर, टोटल सियापा, बाला अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे.
9 / 10
अलीकडे ती ‘भूत पुलिस’ या सिनेमात दिसली.लवकरच ती लॉस्ट आणि ओह माय गॉड 2 या सिनेमात झळकणार आहे
10 / 10
यामी गौतमनं नुकतीच दिग्दर्शक आदित्य धरसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता.
टॅग्स :यामी गौतम