Pamela Chopra Death: राणी मुखर्जीच्या सासूबाई पामेला चोप्रा यांचं निधन, अंत्यसंस्काराला पोहोचले बॉलिवूडकर By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 4:45 PM1 / 10प्रसिद्ध फिल्ममेकर यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पामेला चोप्रा (Pamela Chopra) यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाने यशराज कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा आदित्य चोप्रा, सून राणी मुखर्जी आणि छोटा मुलगा उदय चोप्रा आहेत. 2 / 10राणी मुखर्जीचा जवळचा मित्र शाहरुख खान तिला या दु:खाच्या प्रसंगी आधार देण्यासाठी आला होता.3 / 10शाहरुखसोबत त्याचा मोठा मुलगा आर्यन खानही यश चोप्रांच्या घरी पोहोचला आहे.4 / 10पामेला चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ऋतिक रोशनही आला होता.5 / 10 दु:खाच्या प्रसंगी आदित्य आणि राणी मुखर्जीचे सांत्वन करण्यासाठी अनुपम खेरही आले आहेत.6 / 10 आईच्या निधनाचं दु:ख उदय चोप्राच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. त्याने फोटोग्रार्फस समोर हात जोडले.7 / 10आदित्य चोप्राची आई पामेला यांच्या अंत्य दर्शनासाठी राकेश रोशनही आले होते. 8 / 10गायक सोनू निगमही उपस्थित होता.9 / 10अभिनेता फरदीन खानही यश चोप्रा यांच्या घरी आला होता. 10 / 10पामेला चोप्राच्या अंतिम दर्शनासाठी कोरिओग्राफर वैभवी मर्चंटही पोहोचली. आणखी वाचा Subscribe to Notifications